‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:21 AM2018-10-20T00:21:00+5:302018-10-20T00:22:54+5:30

शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या

 Waiting for 'Transit Treatment Center' | ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा कायम

‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा कायम

Next

नाशिक : शहर व परिसरात एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पाच महिने उलटूनही अद्याप जागानिश्चितीपुढे कुठलीही हालचाल वनविभागाकडून झालेली नाही.  विविध अपघातांमध्ये जखमी झालेले दुर्मीळ प्राणी, पक्षी तसेच तस्करीच्या उद्देशाने आणलेले वन्यजीव रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याअगोदर त्यांच्यावर औषधोपचार करणे गरजेचे ठरते. त्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाने ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारणीचा प्रस्ताव नागपूर येथील प्रधान वनसंरक्षक कार्यालय वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात येणार होता.  त्यादृष्टीने तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावाचा प्रवास नाशिक ते नागपूर असा कधी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नाशिकला ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.  सध्या वन्यजिवांवर पश्चिम वनसंरक्षक कार्यालयातच उपचार केले जातात किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी हलविले जाते; मात्र उपचारानंतर शुश्रूषा करण्यासाठी वनविभाग पश्चिम कार्यालयांतर्गत ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे.  याबाबत पश्चिम कार्यालयाने तत्परतेने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.
नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाची हवी मंजुरी
गंगापूर रोपवाटिकांमधील जागेचा विचार ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ करण्यात आला आहे. येथे मोकळ्या जागेत वनविभाग सुमारे अडीच हजार चौरस फूट जागेत हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव व आराखडा नाशिक पश्चिम वनविभागाकडून तीन महिन्यांपूर्वी तयार करून नागपूर प्रधान वनसंरक्षक कार्यालयाच्या वन्यजीव विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांनी सांगितले.
‘कात्रज’च्या धर्तीवर असणार सुविधा
कें द्रामधील सोयीसुविधा, वैद्यकीय उपचारपद्धती, पशुवैद्यकीय डॉक्टर व त्यांचे सहायकांची संख्या, आवश्यक औषधे, पिंजऱ्यांची रचना आदी बाबी विचारात घेत निरीक्षण नोंदविण्यात आले. यानुसार प्रस्ताव तयार करताना सर्व आवश्यक बाबी व सोयी-सुविधांचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात आला आहे.
बिबट्या, माकड, सर्प, गिधाड यांसारख्या पक्ष्यांसाठी स्वतंत्र सुश्रूषा कक्ष उभारण्यात येणार आहे. वन्यजिवांच्या आरोग्य देखभालीसाठी लागणारा दवाखाना या केंद्रात चालविला जाणार असून सर्व प्रकारची आवश्यक साहित्याने केंद्र अद्ययावत राहणार आहे. कात्रज येथील केंद्राच्या धर्तीवर व त्यापेक्षाही दर्जेदार सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Web Title:  Waiting for 'Transit Treatment Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.