जवानाला केला ग्रामस्थांनी सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:19 PM2020-02-09T18:19:01+5:302020-02-09T18:22:35+5:30

लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे.

Villagers make salute to Jawana | जवानाला केला ग्रामस्थांनी सॅल्यूट

लोहोणेर येथील जवान किरण महाजन यांच्या सेवापूर्ती नंतर लोहोणेर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. समवेत किरण शेवाळे यांची पत्नी आशा शेवाळे. 

Next
ठळक मुद्देकिरण महाजन या जवानाची सेवापूर्ती झाल्यानंतर लोहोणेर गावातून सवाद्य मिरवणूक काढून लोहोणेरकरांनी यशोचित सत्कार केला.

लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर होते. १७ वर्षांच्या कालावधीत खडतर देशसेवा करून परत आलेल्या किरण महाजन या जवानाची सेवापूर्ती झाल्यानंतर लोहोणेर गावातून सवाद्य मिरवणूक काढून लोहोणेरकरांनी यशोचित सत्कार केला.
देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या देवळा तालुक्यातील जवानांच्या भविष्यातील उर्वरित काळ सुखाने जावा यासाठी त्यांना नोकरी व व्यवसायासाठी योग्य ती मदत करणार असल्याचे केदा आहेर यांनी यावेळी सांगितले.
किरण महाजन यांनी आपल्या १७ वर्षांच्या कालावधीत फिरोजपूर, अहमदनगर, उत्तर प्रदेश, अमृतसर, कानपूर, जम्मू, राजोरी आदी ठिकाणी जाऊन देशसेवा केली आहे. यावेळी येथील बालाजी मंदिराचे महंत पवनदासजी महाराज, सरपंच जयवंता बच्छाव, कल्पना देशमुख, अमोल पाटील, अनिल सोनवणे, भाऊसाहेब पगार, अतुल पवार, आबासाहेब देशमुख, रमेश आहिरे, दिगंबर कोठावदे, गंगाधर महाजन, सुलोचना शेवाळे, अशोक अलई, बंडू परदेशी, प्रसाद देशमुख, समाधान महाजन, मधुकर बच्छाव, देवबा महाजन, गोटू शेवाळे, विठ्ठल बागुल, पंडित पाठक, धनराज शेवाळे, संजय परदेशी, राकेश गुळेचा, मयूर देशमुख, पंकज परदेशी, अविनाश महाजन, राजेंद्र शेवाळे, सुनील खैरनार, दादाजी महाजन, भगवान शेवाळे, सोमनाथ शेवाळे, शेखर शेवाळे, रवि टेलर यांच्यासह देशसेवेत कार्यरत असलेले व नुकतेच सेवानिवृत्त झालेले जवान अंबादास निफाडे, नीलेश गवळी आदींसह लोहोणेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवा निवृत्त जवान दादाजी वाघ, अ‍ॅड. अमोल पाटील व सत्कार मूर्ती किरण शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पंडित शेवाळे यांनी केले, तर रमेश आहिरे यांनी आभार मानले.
 

Web Title: Villagers make salute to Jawana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.