पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 03:33 PM2019-06-30T15:33:02+5:302019-06-30T15:36:55+5:30

देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Victory in the parliamentary elections by giving a good response to Pakistan | पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन

Next
ठळक मुद्दे काँग्रेसचे 50 आमदारही निवडून येणार नाहीपालकमंत्री गिरिश महाजन यांचे भाकित नाशिकमध्ये भाजपा महिला मोर्चा कार्यकारणीला मार्गदर्शन

नाशिक - देशाच्या सीमा सुरक्षीत कशा राहतील याची मतदारांना काळजी होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशातील जनतेला देशाच्या सुरक्षेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविषयी विश्वास निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरून प्रतिदाद देत 303 जागांवर भाजपाचे खासदार निवडून दिल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.
नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणीच्या  समारोप सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलेत होते. देशात 303 जागा मिळतील असे आम्हाला ही वाटले नव्हते, परंतु यावेळी केवळ लाट नव्हती, तर सुनामी होती, गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता  राज्यातही  मुख्यमंत्री यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले, अनेक प्रश्न चुटकी सरशी सम्पविले,  50 वर्षात निघाले नाही एवढे मोर्चे निघाले, मराठा आंदोलन सह अनेक मोर्चे निघाले, त्यासर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी  कोर्टाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाल्याचेही महाजन म्हणाले,  विरोधकांवर टिका करताना त्यांनी काँग्रेसचे राज्यात 50 आमदाराही निवडून येणार नसल्याचे सांगितले. लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधातील जागा जिंकली.  मात्र बारामती मध्ये थोडे कमी पडलो असलो तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूद केले. माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुलांना पराभूत केले. अजित पवार, नारायण राणे यांच्या मुलांचा पराभव केला, तर  अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. लोकसभेत  काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अभियाने यशस्वी झाले आहे.काँग्रेसची केवळ  एक जागा राज्यात आली.  नाही तर सम्पूर्ण राज्य  काँग्रेस मुक्त झाले असते. त्याचप्रमामे राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून काँग्रेसच्या तिन नेत्यांचे तोंड तीन दिशेला आहे. त्यांचा विरोधीपक्षनेताच आपल्याकडे आला असून  अडून अनेकजण येण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नसून पक्षाध्यक्ष पद सांभाळण्यासही कोणीही समोर येत नसल्याची टिकाही गिरीश महाजन यांनी केली त्यांनी केली. 

परिश्रम केल्या शिवाय संधी नाही
भाजपाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पदाधिकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकांसाठी काम करताना जमिनीवर राहून काम करा. पक्षात परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणाल नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Victory in the parliamentary elections by giving a good response to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.