प्रारुप मतदार याद्यांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:48 AM2019-07-18T00:48:02+5:302019-07-18T00:48:24+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे.

 Verification of form voter lists continued | प्रारुप मतदार याद्यांची तपासणी सुरू

प्रारुप मतदार याद्यांची तपासणी सुरू

googlenewsNext

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची एकूण आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आता सदर याद्यांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदारयाद्या परिपूर्ण आणि दोषरहित करण्यासाठी जिल्हाभर व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नागरिकांना मतदार नोंदणीबाबत जागरूक करण्याची मोहीम महत्त्वाची ठरली. या मोहिमेमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश आले आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास ४० हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे यादीतून वगळ्यात आली, तर सुमारे २८ हजार नवीन मतदारांच्या नावांची नोंदणी होऊ शकली. मतदार कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेदेखील सदर काम वेळेत पूर्ण होऊ शकल्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे आाणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केलेल्या नियोजनानुसार १५ जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित केलेली असल्यामुळे मतदार कर्मचाऱ्यांबरोबरच निवडणूक नायब तहसीलदार, निवडणूक लिपिक यांच्याबरोबरच निवडणूक विभागाच्या कर्मचाºयांनी दिलेल्या मुदतीत काम करून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाºयांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रारूप मतदारयाद्या तयार झालेल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणूक शाखेजवळ सध्या या मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली असून, कर्मचारी कामाला लागले आहेत. याद्यांची बिनचूक छपाई, पाने तसेच मतदार याद्यांचा क्रम तसेच मतदारांची छायाचित्रे आदींची तपासणी करूनच त्यावर निवडणूक शाखेचे शिक्के मारले जात आहेत.
ओळखपत्रांची प्रतीक्षा
निवडणूक शाखेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली असली तरी मतदारांना मात्र ओळखपत्राची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या ओळखपत्रातील त्रुटी, फोटोंचा दर्जा सुमार असल्याने मतदारांना स्मार्ट ओळखपत्र या निवडणुकीत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सदर संपूर्ण प्रक्रिया ही दिल्लीहून होत असल्यामुळे निवडणुकीपर्यंत ओळखपत्र मतदारांना मिळतील का असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Verification of form voter lists continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.