घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम ; २९ कोटी ५० लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:56 AM2019-03-23T00:56:43+5:302019-03-23T00:57:03+5:30

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, शुक्रवारपर्यंत घरपट्टीची २१ कोटी व पाणीपट्टी सोडआठ कोटी अशी एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

 Vacation and Water Tax Campaign; Recovery of 29 million 50 million | घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम ; २९ कोटी ५० लाख वसूल

घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम ; २९ कोटी ५० लाख वसूल

Next

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, शुक्रवारपर्यंत घरपट्टीची २१ कोटी व पाणीपट्टी सोडआठ कोटी अशी एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक आहे. यंदाच्या वर्षी वरिष्ठांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख, तर पाणीपट्टीचे २० कोटी ८० लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, काही थकबाकीदारांना वॉरण्ट बजाविण्यात आले आहे. घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख उद्दिष्टांपैकी शुक्रवार (दि.२२) पर्यंत सुमारे २१ कोटी पाच लाख इतकी वसुली झाली आहे.
मालमत्ता जप्तीची कारवाई
थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या वतीने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. तसेच सूचनापत्र देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांना मनपाच्या वतीने जप्तीच्या वॉरण्ट नोटीस बजाविण्यात आले आहे. मुदत देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याच मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठांनी मार्चअखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक वसुली मोहीम सुरू करण्ययात आली आहे. नागरिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत थकबाकी भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
- डॉ. सुनीता कुमावत, विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग

Web Title:  Vacation and Water Tax Campaign; Recovery of 29 million 50 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.