वावीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 06:20 PM2019-04-25T18:20:47+5:302019-04-25T18:21:20+5:30

सिन्नर तालुक्यातील पंचाळे - शहा रस्त्यावर पुतळेवाडी फाट्याजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक होवून एक जण ठार झाल्याची घटना घडली.

Two-wheeler killed in an accident near Wavi | वावीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

वावीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

Next

वावी : सिन्नर तालुक्यातील पंचाळे - शहा रस्त्यावर पुतळेवाडी फाट्याजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर भीषण धडक होवून एक जण ठार झाल्याची घटना घडली.
अपघातात किशोर (किसन) पांडुरंग घायाळ (वय ३१) रा. भरतपूर ता. सिन्नर यांचा मृत्यू झाला. तर घायाळ यांची पत्नी वनिता व मुलगा अनिकेत तसेच समोरील मोटारसायकलस्वार देखील जखमी झाल्याचे समजते.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किशोर घायाळ हे सिन्नर येथे लग्नसमारंभासाठी पत्नी व मुलासह मोटारसायकलने आले होते. लग्न समारंभ आटोपल्यावर हे दांम्पत्य घरी भरतपुरकडे परतत असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पुतळेवाडी फाट्यावर समोरून येणारी मोटारसायकलने घायाळ यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात किशोर यांच्यासह पत्नी वनिता व मुलगा अनिकेत जखमी झाले. जखमींना उपचारार्थ वावी येथे दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले. तथापि किशोर घायाळ यांचा मृत्यू झाला तर अन्य जखमींवर उपचार सुरु असल्याचे समजते. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

Web Title: Two-wheeler killed in an accident near Wavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.