आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:33 PM2019-02-16T16:33:45+5:302019-02-16T16:45:09+5:30

भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला

Tribal Bihad clashes; Tumble Exam using Guerrilla Cava | आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा

आदिवासींचा बि-हाड मोर्चा धडकला; गनिमी कावा वापरून उधळली परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपरीक्षा केंद्रावर जोरदार ठिय्या आंदोलनदंगलनियंत्रण पथकाची तुकडी, जलद प्रतिसाद पथकाचे कमांडो तैनात रविवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून याअंतर्ग शनिवारी (दि.१६) नाशिक विभागातील उमेदवारांची परीक्षा साईनाथनगर-वडाळा रस्त्यावरील ‘अशोका एनक्लेव’ या व्यावसायिक संकुलात होणार होती; मात्र पहाटेच्या सुमारास आदिवासींचा बिºहाड मोर्चा गनिमी काव्याने येऊन धडकला आणि आंदोलकांनी आक्रमक होत परीक्षा केंद्रावर गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याने परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली.

आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत आश्रमशाळांमधील रिक्त शिक्षक व अधीक्षक व ग्रंथपालसारख्या ‘क’ व ‘ड’ श्रेणीतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १३९५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीप्रक्रियेअंतर्गत साईनाथनगरजवळील परीक्षा केंद्रावर २ हजर ८०० उमेदवार तीन सत्रात परीक्षा देणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेपासून परीक्षेचे पहिले सत्र सुरू होणार होते. शंभरपैखी ३५ गुणांचा लेखी पेपर आनलाईन पध्दतीने घेतला जाणार होता; मात्र ही भरती प्रक्रीया नियमबाह्य व शासनआदेशाला धरून नसल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत    बि-हाड आंदोलकांनी परीक्षा सुरू होण्याअगोदरच परीक्षा केंद्राला घेराव घातला. मोठ्या संख्येने महिला, पुरूष आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात घुसल्याने एकच गोंधळ माजला आणि आंदोलक व पोलिसांत संघर्ष सुरू झाला.

यावेळी दोन प्रवेशद्वारांचे नुकसान झाले. परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून पोलिसांनी जादा कुमक घटनास्थळी बोलविली. दंगलनियंत्रण पथकाची तुकडी, जलद प्रतिसाद पथकाचे कमांडो, इंदिरानगर, मुंबईनाका, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कुठलाही उपयोग झाला नाही. नव्याने पदभरती झाल्यास आमच्यावर अन्याय होईल, आणि पंधरा वर्षे आयुष्याची कंत्राटी पध्दतीने काम केल्याचा शुन्य उपयोग होईल, परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने आंदोलकांनी तीव्र स्वरुपात सगळा ‘बिºहाड’ घेऊन आंदोलनाला सुरूवात केली होती. परीक्षा केंद्राचा ताबा घेत आंदोलकांनी येथे आलेल्या उमेदवारांनाही हुसकावून लावले तसेच काही आंदोलकांनी अधिक आक्रमक होत परिक्षार्थ्यांचे प्रवेशपत्रही फाडल्याचे समजते.

दरम्यान, परिसरात निर्माण झालेला तणाव बघता तत्काळ पोलिस यंत्रणेने अतिरिक्त कुमक तैनात करून आक्रमक आंदोलनामुळे हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कुठलाही उपयोग झाला नाही. नव्याने पदभरती झाल्यास आमच्यावर अन्याय होईल, आणि पंधरा वर्षे आयुष्याची कंत्राटी पध्दतीने काम केल्याचा शुन्य उपयोग होईल, परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने आंदोलकांनी तीव्र स्वरुपात सगळा ‘बि-हाड’ घेऊन आंदोलनाला सुरूवात केली होती.

आंदोलक आक्रमक; पोलिसांचा संयम
परीक्षा केंद्राचा ताबा घेत आंदोलकांनी येथे आलेल्या उमेदवारांनाही हुसकावून लावले तसेच काही आंदोलकांनी अधिक आक्रमक होत परिक्षार्थ्यांचे प्रवेशपत्रही फाडल्याचे समजते. दरम्यान, परिसरात निर्माण झालेला तणाव बघता तत्काळ पोलिस यंत्रणेने अतिरिक्त कुमक तैनात करून आक्रमक आंदोलनामुळे हाताबाहेर जाणारी परिस्थिती अत्यंस सयंमाने हाताळत नियंत्रणात आणली.

रविवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत सर्व आंदोलक परीक्षा केंद्राच्या आवारात ठिय्या देऊन होते. दरम्यान, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत सुमारे दीड तास चर्चा केली. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. यावेळी आमदार डॉ. राहूल आहेर यांनीही संवाद साधला. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या मागणीनूसार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचे बोलण्ी करु न दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आंदोलकांच्या प्रमुखांशी चर्चा करत रविवारी (दि.१६) मुंबईत भेटीची वेळ निश्चित केल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका सोडली.

Web Title: Tribal Bihad clashes; Tumble Exam using Guerrilla Cava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.