न्यायडोंगरीत आहेर हायस्कूलतर्फे वृक्षदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:23 PM2019-07-06T22:23:24+5:302019-07-06T22:25:26+5:30

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व, संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. यानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यातून गावात जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या

Tree Dand through High School High School | न्यायडोंगरीत आहेर हायस्कूलतर्फे वृक्षदिंडी

न्यायडोंगरी येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. त्याप्रसंगी सहभागी विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा सहभाग। वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडी

न्यायडोंगरी : येथील लोकनेते अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वनमहोत्सवानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्त्व, संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली. यानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यातून गावात जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या वृक्षदिंडीमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वनश्री हीच- धनश्री, झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष जगवा, जीवन फुलवा, झाड तेथे पाखरू, धरतीचे लेकरू अशा घोषणांनी गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष नीळकंठ मोतीराम आहेर यांच्या हस्ते लोकनेते मामासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश सोनजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंजाबराव आहेर यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मुखेडच्या जनता विद्यालयात मूकबधिर मुलींचा सत्कार
मानोरी : मुखेड येथील ऋ तुजा आहेर व रोहिणी आहेर या जन्मत:च कर्णबधिर, मूकबधिर असूनदेखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गुणवत्तेच्या जोरावर दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत भगिनींचा गौरव करण्यात आला. प्राचार्य राजेंद्र पाखले, गुलाबराव कोकाटे, लक्ष्मण लभडे, दिगंबर पठारे, सदाशिव शेळके, आप्पासाहेब बडवर, विजय आहेर, रामदास धनगरे, अनिल वावधाने, सुनील पगार, दिलीप खताळ, राजेंद्र बोराळे, संतोष आवणकर, नितीन गोतरणे, आनंदा जाधव, बापूसाहेब वाघ, भागवत बोरनारे, शिवाजी भोरकडे, नवनाथ वायकंडे, माधव गाडे, अनंत कांबळे, श्याम शिंदे, प्रा. दीपक गोराडे, प्रा. सागर वाघ, सुभाष जाधव, श्रीमती शिंदे, हेमलता पाटील, शुभांगी धरम, संगीता कोल्हे, सविता बलकवडे, तृप्ती नढे आदी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Tree Dand through High School High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा