सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:12 AM2018-06-17T00:12:44+5:302018-06-17T00:12:44+5:30

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्याअगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. बकाल यांच्या जागी औरंगाबाद उपनिबंधक सतीश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बॅँकेवर अशाप्रकारे प्रथमच आदेश काढण्यात आले आहेत.

Transfers of Co-operative department | सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्याअगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. बकाल यांच्या जागी औरंगाबाद उपनिबंधक सतीश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बॅँकेवर अशाप्रकारे प्रथमच आदेश काढण्यात आले आहेत.  दरम्यान, सहकार खात्यातील अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या असून, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची सांगली जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स असोसिएशनचे उपनिबंधक गौतम बलसानेंची नियुक्ती करण्यात आली आहे. बलसाने यांनी शुक्रवारी (दि.१५) पदभार स्वीकारला आहे. आर्थिक अडचणीतील बॅँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बॅँकेचे राजेंद्र बकाल यांची १० जून २०१७ रोजी बॅँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली होती.  बकाल यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून संचालक मंडळाच्या वादग्रस्त निर्णयाला चाप बसवित आर्थिक शिस्त लावली, तसेच वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली होती. त्यांची मुदत १९ जून रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे होता. मात्र हा निर्णय होण्याअगोदरच बकाल यांची बदली झाली. पुणे येथील राष्टÑीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथील प्राचार्य रामेंद्र जोशी यांची नाशिक जिल्हा नागरी बॅँक्स असोसिएशनच्या उपनिबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfers of Co-operative department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Transferबदली