मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:12 AM2018-03-02T01:12:04+5:302018-03-02T01:12:04+5:30

चांदवड : चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई-आग्रारोडवर महिंद्र केयूव्ही कार रस्त्याजवळच मोरीवर आदळून कारमधील चार जण गंभीर जखमी झाले.

Three injured in road accident in Jodhpur: Deputy Superintendent Jadhav | मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी

मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी

Next

चांदवड : चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई-आग्रारोडवर महिंद्र केयूव्ही कार रस्त्याजवळच मोरीवर आदळून कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. यात चांदवड पंचायत समितीचे उपसभापती मधुकर मुरलीधर जाधव (५५), दिलीप मुरलीधर जाधव (४८) रा. वडाळीभोई तर शिवाजी नारायण आभाळे ( ४२) आभाळेवाडी नाशिक, सूर्यवंशी आदी पाच जणांचा समावेश आहे. माजी उपसभापती मधुकर जाधव हे त्यांच्या नातलगाच्या दशक्रियेसाठी चाळीसगाव येथे जात असताना मालसाणे शिवारात जीप रस्त्यालगतच्या मोरीवर जाऊन आदळली. या अपघातात गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. गाडीचे डाव्या बाजूचे चाक तुटून पडले. तर छोट्या पुलावरील सरंक्षक भिंत तूटून पडली. चौघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. वडाळीभोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Three injured in road accident in Jodhpur: Deputy Superintendent Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात