जिल्ह्यासाठी लागणार दहा हजार ईव्हीएम मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:43 AM2019-07-20T01:43:50+5:302019-07-20T01:44:51+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा मतदारसंघासाठी जिल्हा निवडणूक शाखेच राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी नोंदविली असून, त्यामध्ये दहा हजार ईव्हीएम मशीन्सचा समावेश आहे.

Tens of thousands of EVM machines will be required for the district | जिल्ह्यासाठी लागणार दहा हजार ईव्हीएम मशीन्स

जिल्ह्यासाठी लागणार दहा हजार ईव्हीएम मशीन्स

Next
ठळक मुद्देतयारी विधानसभेची : राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा मतदारसंघासाठी जिल्हा निवडणूक शाखेच राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी नोंदविली असून, त्यामध्ये दहा हजार ईव्हीएम मशीन्सचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारीचा भाग म्हणून नाशिक जिल्हा निवडणूक शाखेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असून, मतदार याद्या आणि निवडणूक कामांच्या बाबतीत काटेकोर नियोजन केले जात आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य यंत्रांची
मागणी नोंदविण्यात आली असून, यामध्ये दहा हजार बॅलेट युनिट,
सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात सुमारे ४४ लाख इतकी मतदारांची संख्या असून, निवडणूक प्रकिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष खबरदारी घेतली आहे. येत्या १५ सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने निवडणूक शाखेकडून निवडणूक प्रक्रि या सुरळित पार पाडण्यासाठी तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदार याद्या शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. नवीन मतदारांचा समावेश केल्यानंतर १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी दिव्यांग्य मतदारांना मतदान दिल्या जाणाºया सुविधा, मतदान ओळखपत्राचे वाटप, वेब कास्टिंग आदीं सोयी-सुविधांबाबत निवडणूक शाखेकडून तयारी केली जात आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल तोपर्यंत मतदारांची संख्या ४५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मतदारांची संख्या व पंधरा मतदारसंघातील मतदान केंद्रे यांची संख्या लक्षात घेता २२ हजार निवडणूक यंत्राची आवश्यकता आहे. त्यामध्ये दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट मशीन व सहा हजार कंट्रोल युनिट यंत्राची आवश्यकता आहे. ही मागणी निवडणूक शाखेने आयोगाकडे केली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर मिळणार
साधारणत: आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही यंत्रे निवडणूक शाखेला प्राप्त होतील. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपयोगात आणलेली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विधानसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

Web Title: Tens of thousands of EVM machines will be required for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.