फेरसर्वेक्षण होणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:18 PM2020-08-28T22:18:09+5:302020-08-29T00:06:27+5:30

घोटी : प्रस्तावित रेल्वे मार्ग रूंदीकरणाबाबत फेरसर्वेक्षण करण्यात येणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता काहीसा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी-मनमाड मार्गाचे रूंदीकरण करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाकडून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भूसंपादनाच्या नोटिसाही शेतकऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यात रेल्वे मार्गालगतचा काही संबंध नसलेल्या घोटी शहरातील व मध्यवस्तीत असल्याने जागामालकांनाही नोटिसा आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत खासदार व आजी-माजी आमदारांनी रेल्वे विभागाशी चर्चा केली. यात घोटी शहराच्या परिसरात रेल्वेचा काही नवीन प्रकल्प तर होत नाही ना याबाबत उलटसुलट चर्चा होत होती. परंतु हे सर्वेक्षणच चुकीचे असावे असा मतप्रवाह होता. याबाबत शासनविरोधात हरकत घेण्याबाबत धावपळ सुरू झाली होती.

Temporary relief to Ghotikars as re-survey will take place | फेरसर्वेक्षण होणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता दिलासा

फेरसर्वेक्षण होणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता दिलासा

Next
ठळक मुद्देरेल्वे भूसंपादन : प्रक्रियेत कोणती दिशा ठरते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

घोटी : प्रस्तावित रेल्वे मार्ग रूंदीकरणाबाबत फेरसर्वेक्षण करण्यात येणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता काहीसा दिलासा मिळाला आहे.
इगतपुरी-मनमाड मार्गाचे रूंदीकरण करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाकडून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भूसंपादनाच्या नोटिसाही शेतकऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यात रेल्वे मार्गालगतचा काही संबंध नसलेल्या घोटी शहरातील व मध्यवस्तीत असल्याने जागामालकांनाही नोटिसा आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत खासदार व आजी-माजी आमदारांनी रेल्वे विभागाशी चर्चा केली. यात घोटी शहराच्या परिसरात रेल्वेचा काही नवीन प्रकल्प तर होत नाही ना याबाबत उलटसुलट चर्चा होत होती. परंतु हे सर्वेक्षणच चुकीचे असावे असा मतप्रवाह होता. याबाबत शासनविरोधात हरकत घेण्याबाबत धावपळ सुरू झाली होती.
याबाबत खासदार गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आदींनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जैस्वाल यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी, जागामालकांच्या भावना विशद केल्या होत्या. तालुक्यात आजपर्यंत राष्टÑीय व राज्य सरकारच्या प्रकल्पसाठी मोठ्या प्रमाणात जागा गेल्याने आता पुन्हा शेतकºयांना उद्ध्वस्त करू नका, असे नमूद केले. तसेच घोटी परिसरातील केलेले सर्वेक्षण यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे निदशर्नास आणून दिल्याने या मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वे विभागाने खासदार गोडसे, आमदार खोसकर, माजी आमदार मेंगाळ यांना दिली. फेरसर्वेक्षण होणार असल्याने रेल विभाग आता सर्वेक्षणाची दिशा कशी ठरवते याकडे घोटी व परिसरातील शेतकºयांचे लक्ष वेधले गेले आहे.
मनमाड-इगतपुरीदरम्यान रेल्वे मार्गाचे रूंदीकरण, तिसºया व चौथ्या लाईनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली. या प्रोजेक्टमध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, पाडळी, मुकणे, माणिकखांब, मुंढेगाव, व घोटीतील शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यात रेल्वे मार्गाशी कुठलाही संबंध नसलेल्या जमीनमालकांनाही नोटिसा आल्याने परिसरात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घोटीत रेल्वे मार्ग एका बाजूला तर भूसंपादन दुसºया बाजूला होणार असल्याने जागामालकांच्या पायाखालची जमीनच सरकली, त्यात घोटी शहरातील काही जागांचे गट नंबर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Web Title: Temporary relief to Ghotikars as re-survey will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.