सांगवीत बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:11 PM2019-01-06T19:11:32+5:302019-01-06T19:12:06+5:30

सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

Telling Leopard Jeriband | सांगवीत बिबट्या जेरबंद

सांगवीत बिबट्या जेरबंद

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेल्या महिनाभरापासून तीन बछड्यांना जन्म देवून ही बिबट्या मादी नांदूरमध्यमेश्वर कॅनॉलच्या चारी नंबर दहा लगतच्या परिसरात मुक्तपणे वावरत होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी एक बछडा निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने संजय विठोबा घुमरे यांच्या ऊस क्षेत्रालगत पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.४) रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंजºयाचे फाटक पडण्याचा आवाज झाला होता. सदरची माहिती वनविभागास कळविण्यात आली. वनविभाग अधिकारी शरद थोरात व कर्मचारी मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता बिबट्या मादी जेरबंद झाली होती. आजही बिबट्याचा एक बछडा त्या ठिकाणी असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. दोन दिवसांपूर्वी चांगदेव घुमरे यांच्या उसाच्या शेतात एक बछडा पकडण्यात आला होता. वनविभागाच्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Telling Leopard Jeriband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.