आदिवासी बांधवांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:11 AM2018-02-24T00:11:23+5:302018-02-24T00:11:23+5:30

येथील आदिवासी बांधवांनी जागेबाबत सुरू केलेले उपोषण उपविभागीय अधिकाºयांच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.

Suspension of tribal brothers postponed | आदिवासी बांधवांचे उपोषण स्थगित

आदिवासी बांधवांचे उपोषण स्थगित

Next

ठेंगोडा : येथील आदिवासी बांधवांनी जागेबाबत सुरू केलेले उपोषण उपविभागीय अधिकाºयांच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. येथील प्रलंबित बेघर आदिवासींचे जागा मिळण्यासंदर्भात अनुसूचित जमाती कल्याण समिती यांचे आदेश व शिफारस होऊनही आदिवासींच्या जागेसंदर्भात जाणीवपूर्वक दिरंगाई करून गट नं. ७०९ पूर्व अतिक्रमणधारकाला देण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राची चौकशी होणेकामी दि. २१ रोजी उपविभागीय अधिकारी बागलाण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. सदर प्रश्नी आदिवासी बांधव गेल्या एक ते दीड वर्षापासून हक्काचा हिरावलेला निवारा मिळावा यासाठी नियमित पाठपुरावा करीत आहेत.  याप्रकरणास गती देण्यासाठी तहसीलदार बागलाण, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बागलाण, सर्कल सटाणा, ग्रामविकास अधिकारी, ठेंगोडा यांच्यात तातडीची बैठक घेण्याच्या मौखिक आश्वासनानंतर उपोषणार्थी बांधवांनी उपविभागीय अधिकारी बागलाण यांच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले.  आदिवासीच्या जागेप्रश्नी अनु. जमाती कल्याण समिती व ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनीदेखील शिफारस दिली असताना प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे हक्काचा निवारा हिरावून जाण्याची भीती उपोषणार्थी आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. याबद्दल उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांनी उपोषणार्थी आदिवासी बांधवांशी तीन तास चर्चा करून सदर प्रकरणाबाबत योग्य ती कार्यवाही सुरू आहे.

 

Web Title: Suspension of tribal brothers postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक