सराईत गुन्हेगार प्रवीण लोखंडेच्या खुनातील संशयित फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:26 PM2018-09-12T18:26:22+5:302018-09-12T18:54:46+5:30

नाशिक : फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ नागरी वसाहतीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने खून करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, फरार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली़

Suspected absconding accused of the master criminal Pravin Lokhande escaped | सराईत गुन्हेगार प्रवीण लोखंडेच्या खुनातील संशयित फरार

सराईत गुन्हेगार प्रवीण लोखंडेच्या खुनातील संशयित फरार

googlenewsNext
ठळक मुद्दे पंचवटी पोलीस ठाणे : पूर्ववैमनस्यातून घटनासंशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना

नाशिक : फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ नागरी वसाहतीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने खून करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, फरार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली़

फुलेनगर पाटाजवळ असलेल्या वसाहतीत मंगळवारी (दि. ११) रात्री अज्ञात संशयितांनी लोखंडे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ डोक्यात वर्मी घाव बसल्याने लोखंडे जमिनीवर कोसळला व जागेवर गतप्राण झाला़ या घटनेनंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मयत लोखंडे याचे परिसरात राहणाºया काही युवकांसोबत पूर्वी वाद झाले होते. या वादातूनच मंगळवारी लोखंडे याचा तीन ते चार संशयितांनी धारदार शस्त्राने खून केला.

दरम्यान, खून झालेल्या लोखंडे याच्यावर मोबाइल चोरी, प्राणघातक हल्ला, मारहाण यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते़ लोखंडे याचा खून संशयित धात्रक व त्याच्या सहकाºयांनी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पोलीस फरार धात्रकसह संशयितांच्या शोध घेत आहेत़

Web Title: Suspected absconding accused of the master criminal Pravin Lokhande escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.