शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:34 AM2019-04-19T00:34:44+5:302019-04-19T00:36:14+5:30

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना १ मेपासून सुट्या लागणार असून, नवीन शैक्षणिक वर्षात १७ जून २०१९ पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.

 Summer holidays to schools from 1st May | शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी

शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी

Next

नाशिक : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना १ मेपासून सुट्या लागणार असून, नवीन शैक्षणिक वर्षात १७ जून २०१९ पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालकांमार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्याची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत संबंधित जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ, महाविद्यालय व सैनिक शाळांना १ मेपासून सुट्या देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे तेराशे शाळांना जवळपास ४८ दिवस सुटी मिळणार असून, पुढील शैक्षणिक वर्षांत १७ जून २०१९ रोजी पुन्हा शाळा

Web Title:  Summer holidays to schools from 1st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.