ऊसाला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:23 PM2018-11-07T13:23:35+5:302018-11-07T13:23:59+5:30

लोहोणेर : -येथील प्रगतीशील शेतकरी पुष्पा ओंकार कोठावदे यांच्या मालकीच्या गट नंबर ६८८ मधील सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस ...

Sugarcane fire, loss of millions | ऊसाला आग, लाखोंचे नुकसान

ऊसाला आग, लाखोंचे नुकसान

Next

लोहोणेर : -येथील प्रगतीशील शेतकरी पुष्पा ओंकार कोठावदे यांच्या मालकीच्या गट नंबर ६८८ मधील सुमारे पाच एकर क्षेत्रातील ऊस पिकापैकी अडीच एकर उसाला सायंकाळी अचानक शार्टसर्किट होवून आग लागल्याने सुमारे अडीच ते तीन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. लोहोणेर येथील प्रगतीशील शेतकरी ओंकार पोपट कोठावदे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या गटात ऊस पिकाला मेन लाईनच्या विद्युत वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन तारा तुटल्याने शार्टसर्किट झाल्याने आग लागल्यामुळे सुमारे अडीच एकर ऊसाचे पीक जळून खाक झाला. सदर आग विझविण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन बम्बास प्रचारण करण्यात आले होते. परिसरातील शेतकरी व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Web Title: Sugarcane fire, loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.