उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:33 PM2019-04-27T23:33:14+5:302019-04-27T23:34:58+5:30

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Sufferable to avoid getting out of summer: Dr. Patil | उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

Next
ठळक मुद्देउष्माघात टाळणे आवश्यकडोक्याबरोबरच कानही झाकणे गरजेचे

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: उष्माघात टाळण्यासाठी उन्हात बाहेर पडण्याचे टाळावे आणि गरज भासलीत डोक्याबरोबरच कान देखील बंद ठेवावे कारण त्यातील उष्णता थेट मेंदुपर्यंत जात असते. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी केले आहे.


प्रश्न : सध्या मोठ्या प्रमाणात उन जाणवत असून इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढ किंवा उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात.?
डॉ. पाटील : नाशिकमध्ये यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शासनाने उष्माघाताची शक्यता असल्याने विशेष कक्ष सुरू केले आहे. उन्हामुळे उष्माघात तर होऊ शकतोत. परंतु अन्य आजारही होऊ शकतात. उलट्याही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे

प्रश्न: नागरीकांनी काय काळजी घेतली पाहिजे.?
डॉ पाटील: मुळात बाहेर पडणे टाळले पाहिजे आणि बाहेर पडलेच तर सर्वच प्रकारची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच डोक्याबरोबर कान देखील बंद होतील अशी व्यवस्था करूनच बाहेर पडले पाहिजे. पुर्वीचे लोक पागोटे घालायचे त्यातून डोक्याबरोबरच कानाचे देखील संरक्षण होत असे. त्यामुळे ही प्रथम काळजी घ्यावी दुसरीबाब म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही.

प्रश्न: उन्हाळ्यात खूप लोक शीत पेय पितात, त्याबाबत काय सांगाल?
डॉ. पाटील: उन्हाळ्यात पाणी खूप प्यायले पाहिजे आणि लिंबु सरबत देखील घेतले पाहिजे. अलिकडे लोक ताक, लस्सी असे पदार्थ घेतात. परंतु त्यासाठी पाणी कुठून आणले ते शुध्द की दुषीत माहिती नसते. त्यामुळे या काळात जलजन्य आजारही बळवतात. त्या पार्श्वभूमीवर असे पदार्थ टाळले पाहिजे आणि विशेष करून बाहेर खाणे- पिणे टाळले पाहिजे.

मुलाखत- संजय पाठक

 

Web Title: Sufferable to avoid getting out of summer: Dr. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.