उपसमिती गठित : तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणीचा निर्णय महापालिका गाळ्यांचे फेरसर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:53 AM2018-01-26T00:53:25+5:302018-01-26T00:54:03+5:30

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sub-Committee constituted: According to the old contractual terms, reimbursement of renovation of municipal plots | उपसमिती गठित : तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणीचा निर्णय महापालिका गाळ्यांचे फेरसर्वेक्षण

उपसमिती गठित : तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणीचा निर्णय महापालिका गाळ्यांचे फेरसर्वेक्षण

Next
ठळक मुद्देकरारनाम्यानुसारच भाडेआकारणी गाळेधारकांसमवेत बैठक

नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळेभाडे आकारणीसंबंधी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांची उपसमिती गठित करून त्यांना महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. दरम्यान, ३१ मार्च २०१७ पर्यंत तूर्त जुन्या करारनाम्यानुसारच भाडेआकारणी करण्याचेही निश्चित करण्यात आले. महापालिकेने आपल्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अडीच वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार भाडेदरवाढ केली होती. सदर दरवाढ ही अन्याय्य असल्याचे सांगत गाळेधारकांच्या संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. सदर दरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून संघटना लढा देत आहे. दरम्यान, मागील सप्ताहात मंत्रालयात आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे गाळेधारकांसमवेत बैठक होऊन चर्चा झाली होती. या चर्चेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने निर्णय घेण्याच्या सूचना राज्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार, गुरुवारी (दि.२५) महापौर रंजना भानसी यांनी समितीची बैठक बोलाविली होती. यावेळी सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती सभापती व सभागृहनेता आदी उपस्थित होते. बैठकीत, गाळ्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी उपआयुक्त कर यांचेसह बांधकाम, विविधकर आणि नगररचना विभागाच्या अधिकाºयांची उपसमिती गठित करण्यात आली. या समितीने महिनाभरात फेरसर्वेक्षण करत अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले. तसेच गाळेधारकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यावरही चर्चा झाली. त्यासाठी बांधकाम, विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठा या विभागाच्या अधिकाºयांची समिती गठित करून गाळेधारकांना त्या-त्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी विविध कर विभागाने महिनाभरात पार पाडावी, असे आदेश देण्यात आले. दरम्यान, गाळेधारकांना त्यांच्या जुन्या करारनाम्यानुसार ३१ मार्च २०१७ पर्यंत भाडेआकारणी करण्याचेही ठरविण्यात आले. तसेच २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीपर्यंत गाळेधारकांनी मालमत्ता कर भरावा, असेही आदेशित करण्यात आले. फेरसर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.
बंद दाराआड खल
गाळेधारकांच्या प्रश्नी पदाधिकाºयांनी बंद दाराआड चर्चा केली. समितीच्या बैठकीला माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला आणि महापौरांचे नाव त्यासाठी जाणीवपूर्वक पुढे करण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत सत्ताधारी भाजपात धुडगूस घालणाºया दोघा पदाधिकाºयांनीच माध्यमांना दूर ठेवण्याचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले. महापौरांना अडचणीत आणण्याची ही खेळी असल्याचे नंतर महापौरांच्याही लक्षात आले. पारदर्शी कारभाराचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपातील काही उपद्रवी पदाधिकाºयांमुळे पक्ष मात्र अडचणीत येऊ पाहत आहे.

Web Title: Sub-Committee constituted: According to the old contractual terms, reimbursement of renovation of municipal plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.