स्वराजित संगीत अकादमीतर्फे गायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:15 AM2018-05-15T01:15:17+5:302018-05-15T01:15:17+5:30

‘ओम नमोजी आद्या’तून स्वरदेवतेची आराधना करत, ‘सूर निरागस हो’, ओंकार अनादि अनंत, नयन तुजसाठी अशा एकाहून एक सरस गीतांनी मैफलीची रंगत वाढवली. रविवारची सोनेरी संध्याकाळ रसिकांना मराठी-हिंदी गीतांनी नवा अनुभव देऊन गेली. स्वरांची, नादाची अनोखी मैफल जीवनाचा नवा अर्थ उलगडून सांगत होती.

 Singing by Swarajit Music Academy | स्वराजित संगीत अकादमीतर्फे गायन

स्वराजित संगीत अकादमीतर्फे गायन

Next

नाशिक : ‘ओम नमोजी आद्या’तून स्वरदेवतेची आराधना करत, ‘सूर निरागस हो’, ओंकार अनादि अनंत, नयन तुजसाठी अशा एकाहून एक सरस गीतांनी मैफलीची रंगत वाढवली. रविवारची सोनेरी संध्याकाळ रसिकांना मराठी-हिंदी गीतांनी नवा अनुभव देऊन गेली. स्वरांची, नादाची अनोखी मैफल जीवनाचा नवा अर्थ उलगडून सांगत होती.  स्वराजित संगीत अकादमीतर्फे सप्तसूर-सप्तरंग या अनोख्या मैफलीचे आयोजन विश्वास लॉन्स येथे करण्यात आले होते. त्यात शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित मराठी-हिंदी गाण्यांचा समावेश होता. डर लागे गरजे बदरीया, सूर आनंदघन, रसिका मी कैसे, ना मनोगे तो, आज म्हारे घर, रैना बीती जाये, नैया ना धरो, ना जिया लागेना, बोले रे पपिहरा अशा गीतांना रसिकांनी मनसोक्त दाद दिली. जुन्या गीतांची जादू अजून नव्या-जुन्या पिढीवर टिकून आहे याचा हा स्वरानुभव होता. अकादमीच्या विद्यार्थिनींनी गीते सादर केली. स्वानंद बेदरकर यांचे निवेदन त्याचबरोबर राजश्री शिंपी, नंदिता सोहोनी, जयश्री राजे, अनघा जोशी, सीमा बोरकर, स्वाती शाह, लीना जोशी, जयश्री राजेगावकर, निलांबरी औरंगाबादकर, रंजनी गेहानी यांनी सुमधुर गायन  केले.  संगीतसाथ अनिल धुमाळ, अमोल पाळेकर, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा यांनी केली. ध्वनिव्यवस्था गोकुळ पाटील यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अशोक कटारिया, जितेंद्र कामतीकर, डॉ. मनोज शिंपी, राजा पाटेकर, रागिणी कामतीकर यांनी दीपप्रज्वलन केले.

Web Title:  Singing by Swarajit Music Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक