अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:33 AM2017-08-31T00:33:22+5:302017-08-31T00:33:29+5:30

बांधकाम साईटवर काम करणाºया कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा प्रकार मंगळवारी (दि़२९) उघडकीस आला़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयित दिलीपकुमार ऊर्फ कुंदनकुमार श्रीखजनची साहनी (रा़ उत्तर प्रदेश) याच्या विरोधात बलात्कार तसेच पोस्को गुन्हा दाखल केला आहे़

Sexual harassment on a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

googlenewsNext

नाशिक : बांधकाम साईटवर काम करणाºया कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा प्रकार मंगळवारी (दि़२९) उघडकीस आला़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी संशयित दिलीपकुमार ऊर्फ कुंदनकुमार श्रीखजनची साहनी (रा़ उत्तर प्रदेश) याच्या विरोधात बलात्कार तसेच पोस्को गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील कुटुंब रोजगारासाठी तपोवन रोडवरील एका बांधकाम साईटवर कामाला आहे़ मार्च २०१७ मध्ये या कुटुंबातील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयित साहनी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला़ तसेच जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली़ दरम्यान, हा प्रकार आईच्या लक्षात आल्याने मुलीकडे विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला़ यानंतर मुलीच्या आईने भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयित साहनी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Web Title: Sexual harassment on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.