त्र्यंबक रस्त्यावर अपघातात एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:43 AM2018-06-09T01:43:14+5:302018-06-09T01:43:14+5:30

त्र्यंबकेश्वर : नाशिक - त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर स्विफ्ट डिझायरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

A serious accident in Trimbak road | त्र्यंबक रस्त्यावर अपघातात एक गंभीर

त्र्यंबक रस्त्यावर अपघातात एक गंभीर

Next

त्र्यंबकेश्वर : नाशिक - त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर स्विफ्ट डिझायरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास स्प्लेंडर दुचाकीने (क्र . एमएच १५ एफडी २२१८) अज्ञात इसम (नाव गाव समजले नाही) त्र्यंबकेश्वरकडे येत असताना नाशिकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर कारचालकाने पलायन केल्यामुळे काहीच समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अपघाताची नोंंद केली आहे.

Web Title: A serious accident in Trimbak road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात