मार्क मार्शल आर्ट्स संस्थेकडून विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 04:39 PM2019-02-07T16:39:14+5:302019-02-07T16:39:23+5:30

नाशिक :- नाशिक येथील मार्क मार्शल आर्ट्स या संस्थेचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान यांनी मुंबई येथील बांद्रा परिसरातील प्रसिद्ध एल एस रहेजा स्कूल आॅफ आर्किटेक्चर मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना महीला सुरक्षा व स्व- संरक्षण शिबिरातून स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कठीण प्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यिक्षकाद्वारे विद्यार्थिनींना मोहम्मद आरिफ खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सानिया खान , मुस्कान खान व मोहम्मद अर्शद आदी उपस्थित होते.

 Self-protection lessons from the Marc martial arts organization | मार्क मार्शल आर्ट्स संस्थेकडून विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

मार्क मार्शल आर्ट्स संस्थेकडून विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे

Next
ठळक मुद्दे मार्क मार्शल आर्ट्सचे संस्थापक मुख्य प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान हे मार्क मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून गेल्या चोवीस वर्षापासून विद्यार्थी व विद्यार्थिनीना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. त्यामाध्यमातून गेल्या दोन वर्षापासून मुंबई येथील

नाशिक :- नाशिक येथील मार्क मार्शल आर्ट्स या संस्थेचे मुख्य प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान यांनी मुंबई येथील बांद्रा परिसरातील प्रसिद्ध एल एस रहेजा स्कूल आॅफ आर्किटेक्चर मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना महीला सुरक्षा व स्व- संरक्षण शिबिरातून स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कठीण प्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यिक्षकाद्वारे विद्यार्थिनींना मोहम्मद आरिफ खान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सानिया खान , मुस्कान खान व मोहम्मद अर्शद आदी उपस्थित होते.

मार्क मार्शल आर्ट्सचे संस्थापक मुख्य प्रशिक्षक मोहम्मद आरिफ खान हे मार्क मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून गेल्या चोवीस वर्षापासून विद्यार्थी व विद्यार्थिनीना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. त्यामाध्यमातून गेल्या दोन वर्षापासून मुंबई येथील एल एस रहेजा कॉलेज येथे मोहम्मद आरिफ खान येथील विद्यार्थिनीना प्रशिक्षण देत आहे.
यावेळी महिलांनी सबलीकरण करून महिला स्वावलंबी बनाव्या यासाठी प्रशिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी स्वसंरक्षणातील पकड हा प्रकार विद्यार्थिनींना समजाविण्यात आला. अचानक एखाद्या व्यक्तीवर हल्ला करून तिला पकडणे तसेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर यावेळी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संकटातून बाहरे कसे पडावे यावर युक्ती प्रात्यक्षिकाद्वारे पटवून सांगण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखिवण्यात आले. या शिबिरासाठी प्राचार्य आर्कि. मंदार परब व सहा प्रा.आर्क.अनुज गुडेकर, विनोद कांबळे,मानसी वाळगावकर, रिकी प्रजापती आदींचे सहकार्य लाभले.(07 मार्शल आर्ट्स)

Web Title:  Self-protection lessons from the Marc martial arts organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.