मालेगाव महापालिकेतर्फे प्रांत, जुने तहसील कार्यालयाला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:46 PM2018-01-31T23:46:25+5:302018-02-01T00:00:50+5:30

थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरली नसल्याने प्रांत कार्यालय व जुने तहसील कार्यालय बुधवारी महापालिकेतर्फे सील करण्यात आले.  महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांनी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सील तोडून कामकाजाला सुरुवात केली.

Sealed to the Old Tehsil office of the province, by Malegaon municipality | मालेगाव महापालिकेतर्फे प्रांत, जुने तहसील कार्यालयाला सील

मालेगाव महापालिकेतर्फे प्रांत, जुने तहसील कार्यालयाला सील

Next

मालेगाव : थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरली नसल्याने प्रांत कार्यालय व जुने तहसील कार्यालय बुधवारी महापालिकेतर्फे सील करण्यात आले.  महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांनी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सील तोडून कामकाजाला सुरुवात केली. मंगळवारी प्रांताधिकारी अजय मोरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी आयुक्त कार्यालय गाठत हरितपट्टा भागातील अनधिकृत अकृषिक वापर करून कत्तलखाना सुरू असल्यामुळे २३ लाख २६ हजार ७६ रुपये तसेच लोकलेखा परिषदेचे दहा कोटी रुपये शुल्क भरावेत यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेतली होती; मात्र मनपा आयुक्तांनी चर्चा केली नाही. यामुळे मंगळवारी तहसीलदार देवरे व अधिकाºयांनी कत्तलखाना सील केला होता. तसेच मनपा सहाय्यक आयुक्तांची दोन वाहने जप्त केली होती.   या कारवाईनंतर बुधवारी महापालिका प्रशासनाने येथील उपविभागीय कार्यालयातील घरपट्टी ५६ हजार ३४५ रुपये थकीत आहे. त्याची व्याजासकट ७६ हजार ६२८ रुपये भरावेत म्हणून प्रांत कार्यालयाला अटकाव (सील)ची कारवाई केली आहे. तसेच जुने तहसील कार्यालयाची घरपट्टी व पाणीपट्टीपोटी एक लाख १० हजार ७२४ रुपयांची नोटीस बजावण्यात आली होती. व्याजासकट महसूल प्रशासनाने १५० हजार ५८५ रुपये भरावे लागणार होते; मात्र सदर मालमत्ता कर महसूल प्रशासनाने भरला नसल्यामुळे महापालिकेने जुने तहसील कार्यालयालाही अटकाव (सील) केले आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, उपायुक्त कमरूद्दीन शेख, प्रभाग अधिकारी अनिल पारखे, पंकज सोनवणे, किशोर गिडगे, अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे, जप्ती अधिकारी हरिश डिंबर, संकीर्ण कर अधीक्षक एकलाख अहमद, त्रिभुवन आदींसह इतर अधिकाºयांनी ही कारवाई केली.
अटकावची कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे. पूर्वी जप्तीच्या नोटीसा दिल्या आहेत. शहरात वसुलीची मोहीम सुरू आहे. अपर जिल्हाधिकारी व प्रांत अधिकाºयांशी यापूर्वीच चर्चा झाली होती. त्यामुळे मंगळवारी चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. मनपा अधिकाºयांना धनादेश देण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र आॅडीटरने दिलेल्या शेºयाप्रमाणे रक्कम देण्यास अडचण निर्माण झाली. महसूलचे अधिकारी रागारागाने गाड्या घेवून निघून गेले. बुधवारीही धनादेश घेतला नाही. - संगीता धायगुडे, आयुक्त, मनपा
महापालिका प्रशासनाने केलेली अटकावची कारवाई चुकीची आहे. प्रारंभी चलसंपत्ती जप्त करणे गरजेचे होते. अटकावच्या कारवाई आधी नोटीसही देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल. महापालिकेकडे शासकीय वसुली करण्यासाठी गेलो असता मनपा आयुक्त धायगुडे यांनी चर्चा न करताच दालनातून निघून गेल्या. सकारात्मक चर्चा करणे गरजेचे होते. - ज्योती देवरे, तहसीलदार 
महसूल प्रशासनाला मनपाने मालमत्ता कर वसुलीची २० जुलै २०१७ रोजी ५६ हजार ३४५ रुपये भरण्याची नोटीस दिली होती. या नोटीसनंतर कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. व्याजासकट ७६ हजार ६२८ रुपयांची मालमत्ता जप्तीची नोटीस देऊन अटकावची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे महसूल व मनपा प्रशासनातील असमन्वय उघडकीस आला असून, शासकीय वसुलीवरून दोघा विभागांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मनपा आयुक्त संगीता धायगुडे व महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sealed to the Old Tehsil office of the province, by Malegaon municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक