सप्तशृंगगडावर परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:16 PM2017-10-01T23:16:33+5:302017-10-02T00:11:18+5:30

श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद विजयादशमीला मिटले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीत बोकडबळी देत प्रथा व परंपरा कायम ठेवली.

Saptashringagad has a tradition | सप्तशृंगगडावर परंपरा कायम

सप्तशृंगगडावर परंपरा कायम

googlenewsNext

कळवण : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद विजयादशमीला मिटले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीत बोकडबळी देत प्रथा व परंपरा कायम ठेवली.
श्री सप्तशृंगी निवासिनी देवस्थानला जिल्हा व तालुका प्रशासनाने बोकडबळी देण्यास विरोध केला असल्याने सप्तशृंगगडावर विजयादशमीला ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, सप्तशृंगगड ग्रामस्थ व भाविकवर्गाने सप्तशृंगी निवासिनी देवस्थानच्या हद्दीबाहेर ग्रामपंचायत हद्दीत परंपरागत चालत आलेला बोकडबळी देत जिल्हा व तालुका प्रशासनाचा आदेश झुगारून प्रथा व परंपरा कायम ठेवली. श्री सप्तशृंगी देवस्थानमार्फत दिला जाणारा बोकडबळी महसूल प्रशासनाने यंदापासून बंद केला असला, तरी सप्तशृंगगड ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी देवस्थान हद्दीबाहेरील सुरक्षित जागेवर सालाबादप्रमाणे होणारे सर्व विधी व परंपरेनुसार बोकडबळी दिला. नवरात्रोत्सव व बोकडबळी या प्रथा- परंपरेसाठी होणाºया विधीच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट स्थापन होण्याच्याही आधीपासून नवरात्रोत्सवाची सांगता होमहवन पूर्णाहुती सोहळ्यासह बोकडबळीने करण्याची परंपरा सप्तशृंगगडावर होती. दसºयाच्या निमित्ताने सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत बोकडाची शिवालय तलाव ते मारुती मंदिर व पहिली पायरी अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कळवण तालुक्यातील देवळी बिलवाडी येथील आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, ढोल-ताशे व भोवाडा पथकाने दिलेल्या करमणुकीच्या मेजवानीने उपस्थित खूश झाले.
 

Web Title: Saptashringagad has a tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.