वाहतूक शाखेच्या कार्यालयात रिक्षाचालकांची शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:38 PM2018-12-05T23:38:42+5:302018-12-05T23:39:21+5:30

नाशिक : रिक्षावरील कारवाईमुळे संतप्त तिघा रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 Rickshaw pullers in the traffic branch office | वाहतूक शाखेच्या कार्यालयात रिक्षाचालकांची शिवीगाळ

वाहतूक शाखेच्या कार्यालयात रिक्षाचालकांची शिवीगाळ

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

नाशिक : रिक्षावरील कारवाईमुळे संतप्त तिघा रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकावर (एमएच १५ एफयू ०८७८) कारवाई केली होती़ यावेळी संशयित अक्षय कल्याण अहिरे (२४, रा. शिवाजीनगर, सातपूर), ज्योती समाधान गायकर (३१, रा. वरीलप्रमाणे) व योगेश मुरलीधर अहिरे (३६, रा. समर्थ सोसायटी, दिघे रोड, भोसरी, पुणे) यांनी शहर वाहतूक शाखा युनिट दोनच्या कार्यालयात आरडाओरड व पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला होता़

मोबाइल क्रमांक विचारण्याच्या बहाण्याने चोरी
नाशिक : मोबाइल क्रमांक विचारण्याच्या बहाण्याने एका संशयित महिलेने घरातील सोफ्यावर ठेवलेला महागडा मोबाइल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़४) दुपारच्या सुमारास महात्मानगर परिसरातील घडली़ या प्रकरणी प्रांजल पाटील (१९, रा. १, रेखाकृती सोसायटी) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

डोक्यात बाटली फोडल्याने तरुण जखमी
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रगती हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या बिपीन शशिकांत दाणी (३१, सिद्धटेक सोसायटी, काठे गल्ली) या तरुणाच्या डोक्यावर दुचाकीवरील (एमएच १५, बीक्यू ८६६७ ) तिघांनी बाटली फोडून तसेच मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ यामध्ये बिपीन दाणी हा तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शहर बसच्या बॅटऱ्यांची चोरी
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या पंचवटी बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शहर बसच्या (एमएच २०, डी ९४०८) १२ हजार रुपयांच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ व ४ डिसेंबरच्या दरम्यान घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Rickshaw pullers in the traffic branch office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.