सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:51 AM2018-06-06T00:51:09+5:302018-06-06T00:51:09+5:30

सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.

Representation of the Tahsildar by the Representative | सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन

सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन

Next
ठळक मुद्देइंधन दरवाढ मागे घ्यावी

सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.
आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत इव्हीएम यंत्राचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करावा, देशात गगनाला भिडलेले डिझेल व पेट्रोलचे भाव कमी करावे व ते जीएसटी अंतर्गत आणावे, अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा पूर्वीपेक्षा अधिक कडक करावा त्यासाठी संसदेत वटहुकूम आणावा, राज्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच कर्ज विनाअट माफ करावे, आदीप्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस किशोर सोनावाने, तालुका अध्यक्ष बापुराज खरे, नगरसेवक बाळासाहेब बागुल, पक्षाचे देवा गांगुर्डे, बापूसाहेब पवार, यशवंत आहिरे, अप्पा बोराळे, शरद जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Representation of the Tahsildar by the Representative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक