दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:31 PM2017-09-23T23:31:25+5:302017-09-24T00:27:00+5:30

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

The rate of daily commodity is to the Gaganala | दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

दैनंदिन वस्तूंचे दर गगनाला

Next

कळवण : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिली जात आहे. इतकेच नव्हे तर १० ते १२ तास विजेचे भारनियमन सध्या करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना कळवण शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात येऊन याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ व कळवणचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कैलास चावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटीसारख्या दुय्यम प्रश्नांमध्ये व्यस्त आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षांत पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८० रुपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, भारनियमन कमी होताना दिसत
नाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ योग्य उपाययोजना  आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, भाजपा सरकारने केलेल्या कर्जमाफीचा अद्यापही घोळच सुरू आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे व महागाई कमी केली पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना जितेंद्र वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ बच्छाव, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण बाजार समितीचे संचालक, शिवसेनेचे गणप्रमुख शीतलकुमार आहिरे, तालुका संघटक संभाजी पवार, उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, विभागप्रमुख अंबादास जाधव, संजय रौंदळ, किशोर पवार, ललित आहेर, सचिन पगार, अप्पा बुटे, विनोद मालपुरे, विनोद भालेराव, किशोर ततार आदी उपस्थित होते.

Web Title: The rate of daily commodity is to the Gaganala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.