इनरव्हील क्लबच्या वतीने रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:46 PM2017-08-08T23:46:53+5:302017-08-09T00:15:29+5:30

इनरव्हील क्लब आॅफ कळवणच्या वतीने कळवणला अनोखे रक्षाबंधन साजरे झाले. कळवण तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सुरक्षेची राखी बांधण्यात आली. कळवण तालुक्यातील सर्व शासकीय व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना कायदा व सुव्यवस्थेची राखी बांधण्यात आली व कळवण नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाºयांना आरोग्याची राखी बांधण्यात आली.

Rakshabandhan on behalf of Innervevel Club | इनरव्हील क्लबच्या वतीने रक्षाबंधन

इनरव्हील क्लबच्या वतीने रक्षाबंधन

Next

कळवण : इनरव्हील क्लब आॅफ कळवणच्या वतीने कळवणला अनोखे रक्षाबंधन साजरे झाले. कळवण तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना सुरक्षेची राखी बांधण्यात आली. कळवण तालुक्यातील सर्व शासकीय व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना कायदा व सुव्यवस्थेची राखी बांधण्यात आली व कळवण नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाºयांना आरोग्याची राखी बांधण्यात आली.
यावेळी योगेश मालपुरे, शशी पाटील, पोलीस अधिकारी सुजय घाटगे, शेखर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व माजी सैनिक गणवेशात उपस्थित होते. सूत्रसंचालन निर्मला संचेती यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी अध्यक्ष मीनाक्षी मालपुरे, सेक्रेटरी प्रमिला जैन, नगरसेवक अनिता जैन, शोभा पगार, लता वेढणे, सुचिता रौंदळ, मनीषा वाघ, मंजूषा देवघरे, आश्विनी पाटील, रोहिणी कापडणे, जयश्री शिरोरे, निशा वालखडे, नयना पगार, शीतल मुसळे, रेखा सावकार, रोहिणी पगार, रेखा कोठावदे, मनीषा शिंदे, मनीषा जुन्नरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सेक्रेटरी प्रमिला जैन यांनी आभार मानले.

 

Web Title: Rakshabandhan on behalf of Innervevel Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.