राज ठाकरे यांची  निर्दोंष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:46 AM2019-05-29T01:46:48+5:302019-05-29T01:47:15+5:30

इगतपुरी : परप्रांतीयाविरोधात सन २००८ मध्ये चिथावणी दिल्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी ...

Raj Thackeray's innocent freedom | राज ठाकरे यांची  निर्दोंष मुक्तता

राज ठाकरे यांची  निर्दोंष मुक्तता

googlenewsNext

इगतपुरी : परप्रांतीयाविरोधात सन २००८ मध्ये चिथावणी दिल्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोप सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता केली आहे.
२००८ साली रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाल्याचे माहीत झाल्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्र मक झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात मनसेने आंदोलन केले होते. राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. इगतपुरीतही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी येथील परप्रांतीय हॉटेलवर मनसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. खटल्याची न्यायाधीश के.आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. त्याच दिवशी ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी होऊन पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी वकील एम. डी. तोरणे यांनी काम पाहिले.राज ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. सुशील गायकर, अ‍ॅड. शिरोडकर यांनी काम पाहिले.

Web Title: Raj Thackeray's innocent freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.