राधाकृष्ण गु्रपच्या वतीने रंगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:59 AM2018-03-09T00:59:03+5:302018-03-09T00:59:03+5:30

नाशिक : गुरू मेरे देव:, रंगा रंग दे, आयो रसिया मोरे बन अशा विविध कृष्ण भजनांचे सादरीकरण करण्यात आले आणि राधे कृष्ण ग्रुपच्या वतीने होली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Radhakrishna Group's color festival | राधाकृष्ण गु्रपच्या वतीने रंगोत्सव

राधाकृष्ण गु्रपच्या वतीने रंगोत्सव

Next

नाशिक : गुरू मेरे देव:, रंगा रंग दे, आयो रसिया मोरे बन अशा विविध कृष्ण भजनांचे सादरीकरण करण्यात आले आणि राधे कृष्ण ग्रुपच्या वतीने होली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गंगापूररोडवरील गुप्ता लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमास पं. प्रसाद दुसाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संगीताविषयी मार्गदर्शन केले. मुख्य गायिका नीलिमा अग्रवाल यांनी उर्मिला लाहोटी, कोमल मालाणी, लीना व्होरा, मनीषा डागा, शिल्पा सुगंधी या मान्यवरांनी भजने सादर करून मने जिंकली. यावेळी शिल्पा सुगंधी यांच्या ºिहदम डान्स अकॅडमीच्या वतीने रास क्रीडा सादर करण्यात आली. या नृत्याविष्कारात प्रभा मुंदडा, ज्योती मुंदडा, पूनम डेढिया, रश्मी बूब, मधू वैश्य, मधु अग्रवाला, लीना व्होरा, कोमल, वीणा सोमाणी यांनी सहभाग घेतला. गुप्ता गार्डनचे संचालक गुप्ता तसेच सोनियादेखील यावेळी उपस्थित होत्या.

Web Title: Radhakrishna Group's color festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत