जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:33 AM2019-06-16T01:33:16+5:302019-06-16T01:33:45+5:30

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून परवड सुरू असून, अनेक रुग्णालयांना गळती व पडझड झालेली असल्याने पावसाळ्यात तेथे बसून काम कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून निधीची तरतूद करण्यासाठी सभापती नयना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांनाही अपयश आल्याने आता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

Provision of 52 veterinary dispensaries in the district | जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड

जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड

Next
ठळक मुद्देनिधीचा अभाव । गळकी छते, तडे गेलेल्या भिंती

नाशिक : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून परवड सुरू असून, अनेक रुग्णालयांना गळती व पडझड झालेली असल्याने पावसाळ्यात तेथे बसून काम कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून निधीची तरतूद करण्यासाठी सभापती नयना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांनाही अपयश आल्याने आता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा तक्रारीही केल्या, परंतु जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचे कारण देत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी किमान एक कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव सभापती गावित यांनी ठेवला होता, परंतु तो अमान्य करण्यात आला आहे. या दवाखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी किमान दोन कोटी रुपयांची गरज आहे. यासंदर्भात वारंवार शासन दरबारीही प्रयत्न करण्यात आले असता, शासनाने मालेगाव तालुक्यातील फक्त चार दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील ५२ दवाखाने अखेरच्या घटका मोजत असताना शासनाने केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याने येत्या पावसाळ्यात या दवाखान्यांमध्ये अधिकाºयांनी कामे कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते अशा वेळी पशुवैद्यकीय अधिकाºयांना दवाखान्यातच थांबावे लागत असल्यामुळे गळक्या दवाखान्यांची डागडुजी करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी येत्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा पशुसंवर्धन सभापती नयना गावित यांनी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार आहेत.
उभारणीनंतर दुरुस्ती झालीच नाही
जिल्ह्णात जिल्हा परिषदेचे २५२ पशुवैद्यकीय दवाखाने असून, त्यातील ५२ दवाखान्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जेव्हापासून हे दवाखाने उभारले तेव्हापासून त्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे यातील काही दवाखाने पडण्याच्या अवस्थेत आले आहेत, तर काहींचे छत गळू लागले असून, भिंतींना तडे जाऊन दरवाजे, खिडक्याही जीर्ण झाल्या आहेत.

Web Title: Provision of 52 veterinary dispensaries in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.