पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:34 AM2018-07-28T00:34:14+5:302018-07-28T00:34:31+5:30

पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

Print on the gambling point near the Wagdi river in Panchvati | पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा

पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा

Next

नाशिक : पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़  वाघाडी नदीजवळ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित भरत दिगंबर पुराणिक (२९), बबलू सदानंद नहिरे (३२), प्रशांत भालचंद्र वालेकर (३०), सचिन वसंत मेवले (२६), कुणाल दशरथ पाटील (३२, सर्व रा. वाल्मीकनगर, मजूरवाडी, पंचवटी) हे जुगार खेळत होते़ या पाचही संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य आढळून आले़
वृद्धेची आत्महत्या
नाशिकरोडच्या जेलरोड परिसरातील कैलासजी सोसायटीलगत राहणाºया ६२ वर्षीय वृद्धेने घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास घडली़ कापसाबाई सदाशिव निकम (रा. जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
गांजा बाळगणाºया वृद्धास अटक
देवळालीगाव परिसरात गांजा बाळगणाºया ७० वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली गावातील गायकवाड मळा परिसरातील रामचंद्र भागवत असे या आरोपीचे नाव आहे. संशयित रामचंद्र भागवत हा एमएच १४ बीएच १४६८ क्रमांकाच्या दुचाकीवरून देवळालीगाव ते रोकडोबावाडी यादरम्यान जात असताना उपनगर पोलिसांनी त्याला अडविले. यावेळी त्याची झडती घेतली असता, दुचाकीच्या डिक्कीत १ हजार ३९४ रुपये किमतीचा ६४५.६८ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. तीन पिशव्यांमधील पॅक असलेला गांजा पोलिसांनी जप्त केला. तसेच ३५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकीही जप्त केली.

Web Title: Print on the gambling point near the Wagdi river in Panchvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.