मातामृत्यू रोखण्यासाठी खासगी सेवा घेण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:35 AM2018-08-04T01:35:58+5:302018-08-04T01:36:03+5:30

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.

Preparation for private service to prevent maternal death | मातामृत्यू रोखण्यासाठी खासगी सेवा घेण्याची तयारी

मातामृत्यू रोखण्यासाठी खासगी सेवा घेण्याची तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देसंजीवकुमार : ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्याचे शासनाचे प्रयत्न; विभागनिहाय घेतला आढावा

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.
शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संजीवकुमार यांनी माता मृत्यूचा विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात गर्भवतींना पाठविण्याचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील खासगी डॉक्टरांची मदत घेण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून चाचपणी केली जात असल्याचे आणि ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्याकडे भर दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य खात्याच्या अधिकाºयांची विभागीय बैठक घेऊन आयुक्त संजीवकुमार यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते उपस्थित होते. यावेळी संजीवकुमार यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कालबद्ध आरोग्य कार्यक्रम आखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेताना माता मृत्यू व बाल मृत्यू याकडे अधिक लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना सर्व उपस्थितांना केल्या. घरी प्रसूती होत असल्याने माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे एकही प्रसूती घरी होणार नाही यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्ह्णात माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी नियंत्रण करण्यात येत असून, अ‍ॅनेमिया व हिमोग्लोबीन याबाबतदेखील चांगले काम करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त संजीव कुमार यांना दिले.
आढावा बैठकीस अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव, सहायक संचालक अनिरु द्ध देशपांडे, डॉ. एन. डी. देशमुख, नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. आर. बी. निगडे, डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्णांचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा माता संगोपन अधिकारी आदी उपस्थित होते.
शहरातील डॉक्टरांशी चर्चा
महिला आरोग्य आणि माता मृत्यू रोखण्यासंदर्भात शासनाकडून तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी शहरातील प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ तसेच आयएमचे पदाधिकारी यांच्याशी एका हॉटेलमध्ये आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी चर्चा केली. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामीण भागातील माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या कार्यक्रमासाठी योगदान देणे अपेक्षित असल्याने त्यांच्याशी नियोजनाबाबत चर्चा केल्याचे समजते.

Web Title: Preparation for private service to prevent maternal death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य