नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 06:00 PM2019-06-11T18:00:46+5:302019-06-11T18:02:03+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

Pre-paddy cultivation works in Nandurashore area | नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचणीत असतानाही उधारी, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पावसाच्या ओढीने शेतकामांना प्रारंभ केला आहे.
८ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. मान्सूनचे आगमन केरळमध्ये झाले शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी जमीन नांगरून ठेवली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महागडी खते वापरण्याऐवजी शेणखतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग करत असल्याचे दिसून येत आहे. यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील पिकातून एक रुपयादेखील उत्पादन निघालेले नसून झालेला खर्चसुद्धा वसूल झालेला नाही. ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्य शेतकरी वर्गाने गतवर्षी हवामान खात्याने वर्तविलेल्या पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार महागडी दराने बी-बियाणे, रासायनिक खते उधारित का होईना खरेदी करून मका, सोयाबीन, बाजरीसारखी पिके घेतली होती; परंतु यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गाला पिकातून उत्पादनाऐवजी हातात करपलेल्या झाडांशिवाय काहीच बघायला मिळालेले नाही. आधीच या पिकांची कृषी दुकानदारांची देणी बाकी असून, ती फिटलेली नसताना पुढील नव्याने खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी वर्गाला भांडवलाची मोठी चिंता उभी राहिली आहे. त्यातूनही काहींनी मार्ग काढत उधारी, उसनवार व कर्ज काढून आगामी हंगामाची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोडधंदा उपलब्ध नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे.
नांदूरशिंगोटे येथे व परिसरात प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Pre-paddy cultivation works in Nandurashore area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.