जुने नाशिकला होणार योग्य दाबाने वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:49 AM2018-09-18T00:49:28+5:302018-09-18T00:49:53+5:30

जुने नाशिकला वीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

Power supply to old Nashik pressurized | जुने नाशिकला होणार योग्य दाबाने वीजपुरवठा

जुने नाशिकला होणार योग्य दाबाने वीजपुरवठा

Next

नाशिकरोड : जुने नाशिकलावीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.  जुन्या नाशिकमध्ये वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठ्याबाबत अनेक वर्षांपासून तक्रारी होत्या. जुन्या नाशकातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून टाकळी उपकेंद्रातील जुने झालेले १० एमव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र बदलून २१ लाख रुपये खर्च करून नवीन रोहित्र बसविण्यात आले. नवीन रोहित्राचे उद्घाटन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात येऊन नवीन रोहित्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होऊन अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता शुभांगी काटकधोंड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, अतिरिक्त कार्यकारी श्याम बोरसे, सहायक अभियंता विशाल निंबाळकर, वंदना पेठकर आदी उपस्थित होते.

Web Title: Power supply to old Nashik pressurized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.