तडीपार गुंडावर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:28 PM2018-08-02T17:28:18+5:302018-08-02T17:28:45+5:30

पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी शहर तसेच नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना पंचवटी परिसरात वास्तव्य करणाऱ्या दिंडोरीरोडवरील लामखेडे मळा येथे राहणाºया श्याम सिंग महेंद्रसिंग परदेशी(४२) याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

Police action on the brutal gang | तडीपार गुंडावर पोलिसांची कारवाई

तडीपार गुंडावर पोलिसांची कारवाई

Next

पंचवटी : पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी शहर तसेच नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना पंचवटी परिसरात वास्तव्य करणाऱ्या दिंडोरीरोडवरील लामखेडे मळा येथे राहणा-या श्याम सिंग महेंद्रसिंग परदेशी(४२) याला पंचवटी पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिस उपायुक्तांनी परदेशी याला काही कारणास्तव नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती. परदेशी यांच्यावर कारवाई केलेली असतानाही तो दोन दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात वास्तव्य करीत असल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे सुरेश नरवडे, संदीप शेळके यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ संशियत परदेशी याला ताब्यात घेऊन शासनाची पूर्वपरवानगी न घेता तडीपार असतानाही विनापरवाना शहरात वास्तव्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police action on the brutal gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.