बेशिस्त नागरिकांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:52 AM2019-04-24T00:52:43+5:302019-04-24T00:53:05+5:30

झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Penal action against unarmed citizens | बेशिस्त नागरिकांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई

बेशिस्त नागरिकांवर मनपाकडून दंडात्मक कारवाई

Next

पंचवटी : झाडांचा पालापाचोळा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही वापर करणे, गोदावरी नदीत वाहने धुऊन नदीपात्र दूषित करणे, उघड्यावर लघुशंका करणे, दुर्गंधी पसरविणे अशा बेशिस्त नागरिकांवर पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ अशा वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४९५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून सुमारे १० लाख ३७ हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिका पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कचरा वर्गीकरण न करणाऱ्या १०४ नागरिकांवर कारवाई करण्यात येऊन ५२ हजार रु पयांचा दंड आकारण्यात आला तर २५ व्यावसायिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ४५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रबर, प्लॅस्टिक तसेच पालापाचोळा व इतर वस्तू जाळणाºया डझनभर नागरिकांवर कारवाई करून ६० हजार रु पये दंड वसूल केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया १७९ बेशिस्त नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. सुमारे एक लाख ७० हजार रु पयांचा दंड सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना ठोठावला आहे.
नदीपात्रात वाहने धुण्यात येत असली तरी गोदावरी नदीत प्रदूषण करून नियमांची पायमल्ली केली म्हणून ६९ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १७ हजार ४८० रु पये दंड वसूल केला आहे. उघड्यावर लघुशंका करणाºया तीन तर शौच करणाºया ११ अशा १४ बेशिस्त नागरिकांकडून सहा हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंचवटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या वर्षभराच्या कारवाईत पंचवटी महापालिका लखोपती झाली आहे. उपायुक्त सचिन हिरे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, डी. बी. माळेकर, किरण मारू, उदय वसावे, सिद्धार्थ रामवंशी, रशीद शेख, संजय तिडके, विनय रेवर आदींनी कामगिरी केली आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे निसर्गाला हानी पोहोचत असल्याने ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी घातलेली असली तरी शासनाच्या नियमाची पायमल्ली करून उघडपणे प्लॅस्टिक पिशव्या विक्र ी करणाºया व वापरणाºया ८५ व्यापाºयांविरु द्ध कारवाई करून सुमारे चार लाख ४५ हजार रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर जैविक कचरा घंटागाडीत टाकल्याप्रकरणी चाळीस हजार रु पयांचा दंड आकारून पाच नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Penal action against unarmed citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.