नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 06:18 PM2017-11-24T18:18:20+5:302017-11-24T18:19:27+5:30

महापालिका स्थायी समितीची बैठक : अग्निशमनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Order of the Chairman of Standing Committee for the removal of encroachers in Nashik city | नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

Next
ठळक मुद्देधार्मिक स्थळ हटविण्यात आले; परंतु रस्त्यांत ठाण मांडून बसलेल्या झोपड्या हटविण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्यबिटको रुग्णालयात आग प्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या प्रस्तावाला हरकत

नाशिक : रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेशित करत रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या.
महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी वडाळागाव येथे रस्त्यात असलेले धार्मिक स्थळ हटविण्यात आले; परंतु रस्त्यांत ठाण मांडून बसलेल्या झोपड्या हटविण्यात येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. सूर्यकांत लवटे यांनीही नाशिकरोड परिसरात झालेल्या अतिक्रमणांबद्दल प्रश्न उपस्थित करत सदर अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त का मिळत नाही, असा सवाल केला. यावेळी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी रस्त्यांलगत असलेली अतिक्रमणे प्राधान्यक्रमाने काढून घेण्याचे आदेशित केले. दरम्यान, मुकेश शहाणे यांनी ठरावीक प्रभागांनाच क्रीडा निधीतून व्यायामशाळांचे साहित्य वाटप होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वजा तरतूद असतानाही निधी वाटपाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बिटको रुग्णालयात आग प्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या प्रस्तावाला सदस्यांनी हरकत घेतली. अग्निशमन दलाचे प्रमुख हे गैरहजर असल्याने आणि त्यांच्या कारभाराविरुद्ध प्रचंड तक्रारी असल्याने सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. मुशीर सय्यद यांनी अशोका मार्गावर दुभाजक व पथदीप नसल्याची तक्रार केली. यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी त्याबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली. भागवत आरोटे यांनी भंगार बाजार हटविल्यानंतर नियुक्त केलेल्या पथकांकडून होणाºया कार्यवाहीबद्दल शंका उपस्थित केली. सुनीता पिंगळे यांनी पंचवटी प्रभागात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन होऊनही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी काही शेतकऱ्याचा विरोध असल्याचे सांगितल्यावर सभापतींनी महापालिकेची जागा असताना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेशित केले. अलका अहिरे यांनी डेंग्यूच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनी पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबाबत कार्यवाहीचा तपशील मागितला असता सभापतींनी वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सदर ठेका रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशित केले. मुकेश शहाणे यांनी खासगी मोबाइल कंपन्यांच्या लागणाऱ्या  फलकांकडून महापालिकेने करवसुली करावी, अशी मागणी केली.

Web Title: Order of the Chairman of Standing Committee for the removal of encroachers in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.