मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:45 AM2018-01-05T00:45:08+5:302018-01-05T00:45:58+5:30

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते.

Open Dialogues: You should find out the errors in the work of the speakers of the student council | मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा

मुक्त संवाद : विद्यार्थी सांसद परिषदेतील वक्त्यांचा सूर आपल्या कार्यामधील त्रुटींचा आपणच शोध घ्यावा

Next
ठळक मुद्दे ‘मी आणि माझी कारकीर्द’वर संवादआयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण

नाशिक : जीवनात परिश्रम करताना सातत्य हवे; मात्र त्यासोबत निष्ठा व प्रामाणिकपणाची जोड दिल्यास ध्येय साध्य करणे अधिक सोपे होते. आपण करत असलेल्या कार्याचे स्वत: अवलोकन करून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून जीवनाच्या यशोमार्गातील अडथळ्यांवर मात करता येईल, असा सूर विद्यार्थी सांसद परिषदेतून उमटला.
निमित्त होते, राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित ‘नाशिक व्हिजन-२०१८’चे. गुरुवारी (दि.४) विश्वास लॉन्स येथे पार पडलेल्या या परिषदेत ‘मी आणि माझी कारकीर्द’ या विषयावर मान्यवरांनी मुक्त संवाद साधला. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेता राहुल सोलापूरकर, वैभव मांगले, कवी संदीप खरे, युवा उद्योजक मकरंद पाटील, मराठी चित्रपटसृष्टीचे जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे उपस्थित होते.
दरम्यान, आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडताना खरे म्हणाले, आयुष्य सोपं-अवघड या दोन गोष्टींचे मिश्रण असते. आपल्या आयुष्याकडे आपण कसे बघतो, ते जास्त महत्त्वाचे आहे. मला परीक्षेच्या कालावधीत चौथीला असताना पहिल्यांदा कविता सुचली. पुढे कविता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली. श्याम पाडेकर यांनी वक्त्यांशी संवाद साधला. प्रारंभी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार व विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Open Dialogues: You should find out the errors in the work of the speakers of the student council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.