सटाण्यातील फेरीवाल्यांचे होणार आॅनलाइन सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:30 AM2019-06-10T01:30:01+5:302019-06-10T01:31:29+5:30

सटाणा : येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल ?पद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली. राज्य शासनाने विक्र ेत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र ी विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

The online survey of hawkers will be organized | सटाण्यातील फेरीवाल्यांचे होणार आॅनलाइन सर्वेक्षण

सटाणा पालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे आॅनलाइन सर्वेक्षणाची सुरु वात करताना मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे. समवेत अधिकारी व कर्मचारी.

Next
ठळक मुद्देपालिकेचा विशेष उपक्र म : मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती संकलित केली जाणार

सटाणा : येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल ?पद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली. राज्य शासनाने विक्र ेत्या उपजीविका संरक्षण व पथविक्र ी विनयन योजना मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने सटाणा नगरपरिषद क्षेत्रातील स्थिर, फिरते व तात्पुरत्या फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील पथ विक्र ेता मोबाईलद्वारे आॅनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता पालिका हद्दीतील असा व्यवसाय करणार्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाले व्यवसायिकांनी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पुस्तक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच आदिवासी, विधवा असलेल्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमाती इत्यादीमध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसाय धारक व व्यवसायाचा फोटो आदि कागदपत्रांच्या प्रती मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्वेक्षण करताना जवळ ठेवाव्यात, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती भारती सूर्यवंशी, चेतन विसपुते, धनंजय अिहरे, विजय देवरे, अजय पवार आदी उपस्थित होते.पथविक्रेत्यास ओळखपत्र 
सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्येक पथविक्र ेत्यास ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. विक्र ेत्यांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे यांनी केले.

Web Title: The online survey of hawkers will be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.