मालेगावी दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:11 PM2019-02-07T14:11:31+5:302019-02-07T14:11:40+5:30

मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त केला असून याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

One and a half million bottles of Malegaon seized | मालेगावी दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

मालेगावी दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

Next

मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दीड कोटींचा मद्यसाठा जप्त केला असून याप्रकरणी हरियानातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील चार आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी ठोठाविण्यात आली आहे. भारताबाहेर विक्रीसाठी तयार करण्यात आलेले मद्य चोरट्या मार्गाने महाराष्टÑात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जळगावचे अधीक्षक सुधीर आढाव, धुळ्याचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी आपल्या कर्मचाºयांसह धुळे- औरंगाबाद रस्त्यावर मेहुणबारे बसस्थानका जवळ (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे सापळा लावला. दरम्यान चोरटी वाहतूक करणाºया कंटेनरला पायलेटींग करणाºया ब्रिझा कार (क्र. एच. आर. ९३-२२१२) ला ताब्यात घेतले. कार चालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याने पथकाने पाठीमागुन येणाºया संशयीत टाटा कंटेनर (क्र. एच. आर. ७४. ७३४६) ला अडविले. त्यातील चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी धिरज ट्रान्सपोर्ट कंपनी संगरुळ पंजाब यांचे बिल, वाहतूक परवाना क्रमांक ६७४/ दि. ३१/१/२०१९ व त्यासोबतची कागदपत्रे दाखवली. कागदपत्रांपैकी अर्ज एल- ३८ वर फेमस हॉर्स प्रिमियम व्हिस्की बॅच क्रमांक ०१ जानेवारी २०१९ असे नमुद केले आहे. प्रत्यक्षात सदर मद्याच्या बाटलीची पाहणी केली असता त्यावर बॅच क्रमांक ००३ जानेवारी १९ असे नमुद आहे.

Web Title: One and a half million bottles of Malegaon seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक