मुहर्रमच्या आशुरानिमित्त घरांतच केले नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:40 AM2020-08-31T01:40:17+5:302020-08-31T01:40:56+5:30

मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण्यात आला. बहुतांश समाजबांधवांकडून निर्जली उपवास (रोजा) करण्यात आला. आशुरानिमित्त खास नमाजपठण मशिदींऐवजी घरांतच करण्यात आले.

On the occasion of Muharram Ashura, prayers were offered at home | मुहर्रमच्या आशुरानिमित्त घरांतच केले नमाजपठण

आशुरानिमित्त मुहर्रमच्या ताबुताचे घरातच पूजन करताना मुस्लीम बांधव.

Next
ठळक मुद्देइमामशाहीत शुकशुकाट : धार्मिक कार्यक्र म

नाशिक : मुस्लीम बांधवांचे इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४२ ला  शुक्रवारपासून (दि. २१) प्रारंभ झाला असून, या नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमचा दहावा दिवस रविवारी (दि.३०) हजरत शहीद-ए-आझम इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यौम-ए-आशुरा म्हणून मुस्लीम बांधवांकडून पाळण्यात आला. बहुतांश समाजबांधवांकडून निर्जली उपवास (रोजा) करण्यात आला. आशुरानिमित्त खास नमाजपठण मशिदींऐवजी घरांतच करण्यात आले.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने इस्लामी नववर्षाचा पहिला महिना मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांत शहरात होणाऱ्या जश्न शोहदा-ए-करबलाच्या प्रवचनमाला पार पडल्या नाहीत. काही धार्मिक संस्थांकडून आॅनलाइन पद्धतीने प्रवचनमाला घेतल्या गेल्या. यावर्षी कोरोनामुळे सारडा सर्कलवरील हजरत इमामशहा बाबा दर्गा यांच्या इमामशाहीमध्ये तीनदिवसीय यात्रोत्सवही कोरोनामुळे होऊ शकला नाही. येथील मनाचा ताबूत भाविकांच्या दर्शनासाठी मैदानात आणला गेला नाही. केवळ
मानकरी हिंदू-मुस्लीम सेवेकरी वर्गाने पारंपरिक प्रथा पाळत अळीवच्या बियांपासून हिरवळीचा मानाचा ताबूत उभारला.
इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून मुहर्रम ओळखला जातो. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे प्रिय नातू शहीद-ए-आझम हजरत इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांत त्यांचा संदेश, शिकवणीना उजाळा दिला जातो. यंदा समाजबांधवांनी आपापल्या घरांतच राहून मजलिस पठण, करबलाचा संदेश यावर मंथन, विवेचन धार्मिक पुस्तकांद्वारे केले.
हिंदू बांधव असतात
ताबूतचे खांदेकरी
सुमारे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे सारडा सर्कल येथील इमामशाही दर्ग्यामध्ये सय्यद कुटुंबीयांनी दहा दिवस परिश्रम घेत ताबूत उभारला. या ताबूतचे खांदेकरी म्हणून आशुराच्या दिवशी रविवारी हिंदू कोळी बांधवांनी खांदेकरी होत परंपरा कायम
ठेवली.

Web Title: On the occasion of Muharram Ashura, prayers were offered at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.