टंकलेखन नसल्याने वेतनवाढ रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:42 AM2018-12-07T00:42:40+5:302018-12-07T00:42:51+5:30

नाशिक : जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाºयांनी अद्याप परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाने वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.

With no typing, the salary increases | टंकलेखन नसल्याने वेतनवाढ रोखली

टंकलेखन नसल्याने वेतनवाढ रोखली

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : २४ कनिष्ठ सहायकांना ‘जोर का झटका’

नाशिक : जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाºयांनी अद्याप परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाने वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेत असे २४ कर्मचारी आहेत, त्यांना याबाबत सुचित करण्यात आले होते तसेच अल्टिमेटमही दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधितानी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण केली नाही. जिल्हा परिषदेतील २४ कनिष्ठ सहायकांनीही परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. नियमानुसार वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाºयांनी इंग्रजी व मराठी भाषांतील ३० शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास कोणती कार्यवाही करावी, याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाही. मात्र १९९९ मधील सामान्य प्रशासन विभागाच्या राजपत्राच्या नियमावलीनुसार मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाºयांची वेतनवाढ रोखून धरण्याची तरतूद आहे. याचा आधार घेत सामान्य प्रशासन विभागाने २४ वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाºयांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही केली असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यास मान्यता दिली आहे.दोन वर्षांची मुभा जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाºयांना नियुक्त तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

Web Title: With no typing, the salary increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.