मेहेर सिग्नलजवळ कडुलिंबाचे झाड पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:07 AM2018-07-17T01:07:32+5:302018-07-17T01:07:58+5:30

मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़

 Neem tree near Meher signals fell | मेहेर सिग्नलजवळ कडुलिंबाचे झाड पडले

मेहेर सिग्नलजवळ कडुलिंबाचे झाड पडले

Next

नाशिक : मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ दरम्यान, हा वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने दोन विद्युत पोल वाकले तर त्यांच्या ताराही तुटल्याने या ठिकाणची वाहतूक अशोकस्तंभाकडून गंगापूररोडकडे वळविण्यात आली होती़
अशोकस्तंभ ते मेहेर रस्त्यावरील मित्रविहारजवळील महाकाय निंबाचा वृक्ष सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ यामुळे रस्तादुभाजकावर असलेले विजेचे दोन खांब खाली कोसळले तर विद्युतताराही तुटल्या़ महाकाय वृक्ष पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती़ या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली़  या घटनेची माहिती अग्रिशामक विभागास दिल्यानंतर अवघ्या काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले व कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील वृक्षाच्या फांद्या हटविण्याचे काम सुरू केले़  वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी अशोकस्तंभापासून वाहने गंगापूर रोडकडे वळविण्यात आली होती़ सीबीएस सिग्नलवरील वाहने शालिमारकडे तर मेहेर सिग्नलपासून महात्मा गांधी रोडकडे वळविण्यात आली.तसेच निमाणीकडे जाणाºया बसेस रेडक्रॉस सिग्नलपासून रविवार कारंजाकडे सोडण्यात आल्याने वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली़
सिडको भागात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
दुर्गानगर येथील अ‍ॅडलॅब थिएटरसमोरील वृक्ष सोमवारी (दि़१६) सायंकाळी उन्मळून फोर्च्यूनर वाहनावर पडला़ यामुळे काहीकाळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी झाडाच्या फांद्या हटविल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली़ सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सावतानगर ते त्रिमूर्ती रस्त्यावरील दुर्गानगरच्या अ‍ॅडलॅब्स थिएटरसमोर असलेले झाड रस्त्यावर उभी असलेल्या फोर्च्यूनर या चारचाकी वाहनावर अचानक उन्मळून पडला.यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक व महिला थोडक्यात बचावले़ यावेळी उपस्थित असलेले पवन मटाले, देवेंद्र शेलार, अभिजित सूर्यवंशी, सागर वाघ हे नागरिकांच्या मदतीला धावले़

Web Title:  Neem tree near Meher signals fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस