महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत  नवज्योती महिला मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:55 AM2018-10-17T00:55:10+5:302018-10-17T00:55:35+5:30

गजपथ, म्हसरूळ येथे २९ मार्च २०१० या दिवशी अवघ्या पाच-सहा महिलांच्या सहकार्याने प्रतिभा मेहता यांनी नवज्योती महिला मंडळाची स्थापना केली. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील महिलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली.

Navjyoti Mahila Mandal working for women empowerment | महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत  नवज्योती महिला मंडळ

महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत  नवज्योती महिला मंडळ

googlenewsNext

गजपथ, म्हसरूळ येथे २९ मार्च २०१० या दिवशी अवघ्या पाच-सहा महिलांच्या सहकार्याने प्रतिभा मेहता यांनी नवज्योती महिला मंडळाची स्थापना केली. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील महिलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, त्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली. ग्रुपच्या वतीने आरोग्य, पाककौशल्य, सुजाण पालकत्व, कला, साहित्य आदी विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद आयोजित केला जातो. आजमितीस मंडळाची सदस्यसंख्या अडीचशे ते तीनशेपर्यंत पोहोचली आहे. महिलांच्या विकासाबरोबरच सामाजिक भावनेची जोपासना करण्यासाठीदेखील नवज्योती महिला मंडळ प्राधान्य देत असते. पर्यावरणदिनानिमित्त वृक्षलागवड, अन्नदान, आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांना कपडे, शालोपयोगी साहित्य वाटणे, खाऊ-खेळणी देणे या गोष्टी आवर्जून करण्यात येतात. तंत्रज्ञानाचा वापर केवळ गप्पाटप्पा करण्यासाठी न करता मंडळाच्या उपक्रमांची माहिती महिला सदस्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. मंडळात अनेक महिलांचे लहान-मोठे गृहउद्योग आहेत. या उद्योगांना चालना देण्यासाठी नवज्योती उद्योगिनी हा ग्रुप मंडळाने तयार केला आहे. यासाठी दरवर्षी आनंद मेळावा घेतला जातो. महिला सदस्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ढोल, योगा, डान्स, दांडिया, इंग्लिश स्पीकिंग, कुकिंग, रांगोळी, मंगळागौरीचे खेळ, होम मिनिस्टर असे उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. याबरोबरच ट्रेकिंग, वनभोजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू, उखाणे, पारंपरिक खेळ मंडळाकडून आयोजित केले जातात. ज्या महिलांना नृत्याची आवड आहे, अशांसाठी ‘टिव्स्ट टू डान्स’ ही जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा घेतली जाते. अशा विविध उपक्रमांमधून कायम मंडळातील सदस्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. संस्थेत प्रतिमा मेहता, मंजुषा कुलकर्णी, शिवानी ओझरकर, सुषमा गांधी, अलका फळे, सारिका सुराणा, वर्षा कासलीवाल, नीलम पहाडे, शोभा अहेर, दक्षणा औटी, मंगला थेटे, पल्लवी टेपाळे, स्रेहा मोरे आदी सदस्य सक्रिय सहभाग देत आहेत. कार्यक्रमांची आखणी ते प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडेपर्यंत त्या काटेकोर नियोजन करण्यावर भर देतात.

Web Title: Navjyoti Mahila Mandal working for women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.