स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:31 PM2018-08-08T16:31:26+5:302018-08-08T16:32:04+5:30

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़

nashik,women,twenty,five, thousand,cash,theft,in,State Bank of India | स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

Next
ठळक मुद्देसीबीएसच्या मुख्य शाखेत घटना ; चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील उदवा येथील रहिवासी निर्मला सांबरे या मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पैसे भरण्यासाठी सीबीएसच्या मुख्य शाखेत गेल्या होत्या़ याठिकाणी चोरट्यांनी त्यांची काळ्या रंगाची पर्स चोरून नेली़ या पर्समध्ये २५ हजार रुपयांची रोकड होती़

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

घरफोडीत दागिन्यांची चोरी />नाशिक : बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम व गृहोपयोगी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत घडली़ १७ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी कबीरनगरमधील उषा खरात यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, २० हजार रुपयांची रोकड, दहा हजार रुपयांचा एलसीडी, दोन हजार रुपयांची गॅस टाकी व शैक्षणिक कागदपत्रांची फाईल असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस मारहाण
नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना जुन्या नाशिकमधील कुंभारवाडा परिसरात मंगळवारी (दि़ ७) सायंकाळच्या सुमारास घडली़ स्मिता चव्हाण या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पती राकेश गणपत चव्हाण याने चारित्र्याच्या संशयावरून काठीने मारहाण केली़ तसेच चाकूने हातावर वार केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उपनगरला महिलेची आत्महत्या
नाशिक : बेडरूममधील खिडकीच्या गजाला ओढणीने गळफास घेऊन चाळीस वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) नाशिकरोडच्या कॅनॉल रोडवरील गुरुदत्त कॉलनीत घडली़ सुनीता मंगलराव शेट्टी (रा. कृष्णवेणी बंगला) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नायगाव रोडवरून दुचाकीची चोरी
नाशिक : शिंदे गावाजवळील नायगाव रोड परिसरातील रहिवासी कृष्णा प्रसाद राजाराम सिंग यांची २५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५ जीसी १८७७) चोरट्यांनी नायगाव रोडवरून चोरून नेली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: nashik,women,twenty,five, thousand,cash,theft,in,State Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.