पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 04:58 PM2018-03-28T16:58:54+5:302018-03-28T16:58:54+5:30

नाशिक : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा संदेश येण्यास उशीर होत असल्याची कुरापत काढून पेट्रोलपंपावरील कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि़ २६) रात्रीच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील मेहता पेट्रोलपंपावर घडली़

nashik,trambaknaka,petrolpump,Robbery | पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करून लूट

पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करून लूट

Next
ठळक मुद्देत्र्यंबकनाक्यावरील घटना : आठ संशयितकॅबिनमध्ये घुसून रकमेची लूट

नाशिक : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा संदेश येण्यास उशीर होत असल्याची कुरापत काढून पेट्रोलपंपावरील कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि़ २६) रात्रीच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील मेहता पेट्रोलपंपावर घडली़

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकनाक्यावर जे़ आऱ मेहता अ‍ॅण्ड सन्सचा पेट्रोलपंप असून, या ठिकाणी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास संशयित श्रीकांत भरत वाघ (३०, रा़ विठ्ठलनगर, कामटवाडा, सिडको) हा वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आला़ त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा मेसेज येण्यास इतका उशीर का होतो याची कुरापत काढून त्याने पेट्रोलपंपावरील कर्मचारी सुधाकर सरवानी पटेकर (२४, वडाळागाव, नाशिक) सोबत वाद घालून शिवीगाळ केली़

यानंतर काही वेळाने संशयित वाघ हा आपल्या सात ते आठ साथीदारांसह पुन्हा पेट्रोलपंपावर आला व बळजबरीने पेट्रोलपंपावरील कॅबिनमध्ये घुसून पटेकर यास शिवीगाळ, मारहाण केली़ यानंतर या संशयितांनी पटेकर यांच्या खिशातील १२ हजार ७०० रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतली व फरार झाले़

या प्रकरणी सुधाकर पटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी श्रीकांत वाघ व त्याच्या साथीदारांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, वाघला अटक केली आहे़

Web Title: nashik,trambaknaka,petrolpump,Robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.