जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:02 PM2018-03-15T22:02:04+5:302018-03-15T22:02:04+5:30

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर्गत असणाºया अंगणवाडी सेविकांचा सेवाकाळ कमी करण्यात आल्यामुळे त्यांना सेवानिवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.

nashik,retirement,aganwadi,workers,retired | जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त

जिल्ह्यातील ३०३ अंगणवाडी सेविका होणार सेवानिवृत्त

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय आदेशाचा बसला फटका वयात कपात केल्यामुळे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त

नाशिक : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर्गत असणाºया अंगणवाडी सेविकांचा सेवाकाळ कमी करण्यात आल्यामुळे त्यांना सेवानिवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी दिली.
महाराष्टÑ शासन आणि महिला व बालकल्याण विभागाला २३ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर या निर्णयानुसार १ एप्रिल २०१८ रोजी वयाची ६० वर्ष पूर्ण होणाºया अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्त करण्यात येणार आहे. त्यामध्ये ३०३ अंगणवाडी सेविका, २८० मदतनीस आणि १ मिनी अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. याबाबतची कार्यवाही या विभागाकडून केली जात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सभागृहात दिली.
अंगणवाडी कर्मचाºयांचा सेवानिवृत्ती काळ कमी करण्याचा आणि मानधनात काही प्रमाणात वाढ करण्याचा विषय अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात शासनाने नुकतेच आदेश काढून सेवानिवृत्तीच्या वयात कपात केली आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय पूर्वी ६५वर्ष इतके होते आता ते ६० वर्ष करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना निव्वळ मानधन असल्याने त्यांना ६५ वर्ष सेवाकाळाची सवलत देण्यात आलेली होती. परंतु आता त्यांचे वय कमी करण्यात येऊन आता ६० वर्ष करण्यात आले आहे. अगोदर सवलत आणि पुन्हा सेवाकाळात कपात करण्यात आल्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांना फटका बसला आहे.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात आदिवासी उपाययोजनांतर्गत आदिवासी भागातील ४ कोटी ३५ लक्ष रकमेच्या प्रति अंगणवाडी ६.६० लक्ष याप्रमाणे ६६ अंगणवाडी केंद्र इमारतींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वरमधील दोन, सुरगाणा २२, इगतपुरी २६, कळवण ४, दिंडोरी १ तर नाशिकमधील ६ याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाकडील सर्व योजनांचा निधी येत्या मार्च २०१८ अखेर खर्च करावा, निधी अखर्चिक ठेवू नये अशा सूचना सभापती खोसकर यांनी दिल्या.

Web Title: nashik,retirement,aganwadi,workers,retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.