भुगर्भशास्त्र विद्यार्थ्यांचा पन्ना डायमंड खाणीचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:17 PM2019-01-09T18:17:52+5:302019-01-09T18:18:35+5:30

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाती भुगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशातील पन्ना डायमंड खाणीला भेट देऊन खाणीचा अभ्यास केला. वैज्ञानिक भेट उपक्रमांतर्गत ...

nashik,phenomenon,diamond,practice | भुगर्भशास्त्र विद्यार्थ्यांचा पन्ना डायमंड खाणीचा अभ्यास

भुगर्भशास्त्र विद्यार्थ्यांचा पन्ना डायमंड खाणीचा अभ्यास

Next
ठळक मुद्देकेटीएचएम: वैज्ञानिक भेट उपक्रमांतर्गत दौरा

नाशिक: केटीएचएम महाविद्यालयाती भुगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशातील पन्ना डायमंड खाणीला भेट देऊन खाणीचा अभ्यास केला. वैज्ञानिक भेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी खाणीचे निरिक्षण केले.
महाविद्यालयातील भुगर्भशास्र विभागाद्वारे काढण्यात आलेल्या चार दिवशीय वैज्ञानिक भेटीत विद्यार्थी व शिक्षकांनी भारतातील एकमेव अशा पन्ना डायमंड खाणीची पाहाणी केली. या भेटीत मुलांनी हिऱ्यांची खाण , क्रिस्टरल खाण यांचे निरिक्षण करून हिरे मिळविण्यापासून ते हिºयांची वैशिठये यांची माहिती जाणून घेतली. येथे विद्यार्थ्यांना नमुने गोळा करतांना प्रत्यक्षात हिरे सापडले.
या दौºयात पाच विद्यार्थिनी, १३ विद्यार्थी आणि शिक्षिका, सहाय्यक सहभागी झाले होते. दुसºया दिवशी लोखंडाचे भंडार असलेल्या बरायठा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांनी क्रिमियम धातू आणि प्लॅटीनियम धातूंचे निरीक्षण केले. यावेळी त्यांना तज्ञ अरुण के शांडिल्य यांनी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थांनी धसान नदीच्या भूगर्भकल संरचनेचे निरीक्षण केले.
सागर विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभाग आणि तेथील प्रयोगशाळेचे निरीक्षण देखील विद्यार्थ्यांनी केले. विभागप्रमुख सौ. श्वेता पाटील व सहकारी शिक्षिका हिमानी सोनवणे यांनी सागर विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे व तज्ञ शिक्षकांचे आभार मानले. भूगर्भशास्त्र विभागाच्या प्रा. श्वेता पाटील यांनी दौºयाचे नियोजन केले होते.

Web Title: nashik,phenomenon,diamond,practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.